27.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरक्राईमनामावसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

ही हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर सुरक्षा रक्षक गायब असल्याचे समोर आले होते.

Google News Follow

चर्चगेट या ठिकाणी असणाऱ्या महिला वसतीगृहात झालेल्या तरुणीच्या बलात्कार आणि हत्येमागे तिथलाच सुरक्षा रक्षक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावर १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीचे वडील स्थानिक पत्रकार असल्याची माहिती मिळाली आहे. जेव्हा पोलिस खोलीत गेले तेव्हा तिच्या गळ्याभोवती दुपट्टा होता तर ती ज्या खोलीत राहात होती, त्याचा दरवाजा बाहेरून बंद होता.

सदर घटनेला तिथला सुरक्षा रक्षक जबाबदार असल्याचे समोर आले. ओमप्रकाश कनोजिया असे त्याचे नाव असून या घटनेनंतर त्याने ग्रँट रोड येथे रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

बळीत तरुणी ही मूळची अकोला येथे राहणारी असून मुंबईत शिक्षण घेत होती,चर्चगेट येथील महिला वसतिगृहाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहत होती. मंगळवारी दुपारी तीचा मृतदेह पोलिसाना मिळून आला आहे, तिच्यावर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा

बिहारमधील पडलेल्या पुलाची जबाबदारी असलेली सिंगला कंपनी निशाण्यावर

कुरापती चीनकडून अक्साई चीनपर्यंत रस्ते, कॅम्प, हेलिपॅड्सची उभारणी

अकोला जिल्ह्यात राहणारी ही तरुणी २३ जून रोजी गावी जाणार असल्याचे तिने काढलेल्या तिकिटावरून कळते. तिची हत्या कोणी केली याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नसून मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून वस्तीगृहातील कर्मचारी तसेच तिच्या मैत्रिणीकडे चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा