28 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरक्राईमनामाअनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्माला ४८ तासांची मुदत

Google News Follow

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका इन्स्टाग्राम रीलवरून कंटेंट क्रिएटर सुविज्ञ शर्मा याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. उद्योगपती अनंत अंबानी यांनी संभाषणादरम्यान शाहरुख खानला गप्प राहण्यास सांगितल्याचा दावा या रीलमध्ये करण्यात आला होता. मात्र, हा दावा खोटा, दिशाभूल करणारा आणि मानहानीकारक असल्याचे शाहरुखच्या कायदेशीर पथकाने म्हटले आहे.

हा वाद आध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमातील व्हिडीओवरून सुरू झाला. या रीलमध्ये अनंत अंबानी आणि सद्गुरू यांच्या भेटीचे दृश्य तसेच शाहरुख खान आणि अनंत अंबानी यांच्यातील संभाषणाचा स्वतंत्र व्हिडीओ जोडण्यात आला होता. या संभाषणादरम्यान शाहरुखला शांत राहण्यास सांगितल्याचा दावा सुविज्ञ शर्मा याने रीलच्या माध्यमातून केला होता.

२३ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीत शाहरुखच्या पथकाने या दाव्याला कोणताही ठोस आधार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमधून संभाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, त्यामुळे अभिनेत्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असेही नमूद केले आहे. यासाठी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५६ अर्थात मानहानीच्या तरतुदीचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

युवीचा गुरुमंत्र, वैभवचा षटकारतंत्र!

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

नोटिशीत सुविज्ञ शर्माला संबंधित रील तातडीने हटवणे, यापुढे हा दावा सत्य असल्याप्रमाणे प्रसारित न करणे, संबंधित कॅप्शन आणि विधाने हटवणे किंवा दुरुस्त करणे, मूळ व्हिडीओ आणि प्रकाशनाशी संबंधित सर्व पुरावे जतन करणे तसेच ४८ तासांत लेखी स्वरूपात कार्यवाहीची माहिती देणे, अशा पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा