36 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरक्राईमनामाशिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; निकटवर्तीयांना गंडा

शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; निकटवर्तीयांना गंडा

सायबर भामट्यांचा हात; लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय

Google News Follow

Related

मुंबई: शिवसेनेच्या (शिंदे गट) राष्ट्रीय सचिव आणि नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यांच्या निकटवर्तीयांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी शायना एन.सी. यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. समोरच्या व्यक्तीने त्यांचे पार्सल येणार असल्याचे सांगून पत्ता विचारला. मात्र, कोणतेही पार्सल मागवले नसल्याने शायना यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या स्वीय सहाय्यकांना याबाबत कल्पना दिली.

काही वेळातच शायना एन.सी. आणि त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश घोडके यांना ओळखीच्या लोकांचे फोन येऊ लागले. हॅकर्सनी शायना एन.सी. यांच्या व्हॉट्सॲपवरून त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाला, “कृपया मला तातडीने मदत करा, या खात्यावर ४९ हजार रुपये पाठवा, मी लवकरच परत करेन,” अशा आशयाचे संदेश इंग्रजीमध्ये पाठवले होते. हे मेसेज शायना एन.सी. यांच्याकडूनच आले आहेत, या समजुतीने अनेकांनी तत्परता दाखवत ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले.
हे ही वाचा:
पाणबुड्यांचा ‘कर्दनकाळ’ भारताच्या ताफ्यात; MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर दाखल

वर्क-लाईफ बॅलन्स बिघडतोय? ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

‘मेहनत, जिद्द, संस्कारांच्या बळावरच गाठता येते यशाचे शिखर’

SIR मोहिमेदरम्यान महिला बीएलओशी गैरवर्तन; चार आरोपी गजाआड
घोडके यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने इतरांशी संपर्क साधून कोणालाही पैसे न पाठवण्याचे आवाहन केले. मात्र, तोपर्यंत अनेकांना गंडा घालण्यात आला होता. आतापर्यंत किमान सहा जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ज्या बँक खात्यांवर हे पैसे पाठवण्यात आले, त्यापैकी काही खाती इतर राज्यांतील असल्याचे निलेश घोडके यांनी सांगितले. ही फसवणूक लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता असून, पोलीस आता बँक व्यवहारांच्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा