25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाधक्कादायक! पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार!

धक्कादायक! पुण्यात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार!

आरोपीची ओळख पटली, शोध सुरू

Google News Follow

Related

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता गुन्हेगारी घटनांमुळे सध्या चर्चेत आहे. कोयता गँग, अपहरण, मारहाण आणि हत्या अशा विविध घटना पुण्यातून वारंवार समोर येत आहेत. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस स्थानकावर लागलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संताप जनक घटना घडली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख पटली असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वारगेट बस स्थानकावर हि घटना आहे. काल (२५ फेब्रुवारी) सकाळी साडेपाच वाजता एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली. पहाटेच्या वेळी अंधाराचा फायदा घेत आरोपीने तरुणीवर अत्याचार केला आणि पळ काढला. तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीसीपी पाटील मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आपल्या गावी फलटणला जात होती. ती बस पकडण्यासाठी स्थानकावर आल्यानंतर आरोपीने तिच्याशी ओळख करत गप्पागोष्टी मारल्या, सीसीटीव्हीमध्ये हे दिसत आहे.

तरुणी कुठे जाणार असल्याची विचारपुस करत आरोपीने तिला फलटणला जाणारी बस दुसऱ्या ठिकाणी लागल्याचे सांगितले. बसमध्ये बसवतो म्हणून गोड बोलत आरोपीने तिला बस स्थानकावर लागलेल्या बसमध्ये नेले, मात्र बसमधील लाईट बंद असल्या कारणाने तरुणीने विचारपूस केली.  यावर आरोपीने तरुणीला सांगितले रात्रीची बस लागली आहे, बसमध्ये लोक झोपलेले आहेत, त्यामुळे बसमधील दिवे बंद आहेत, मोबाईलचा ‘टॉर्च’ लावून बघ मग दिसेल.

तरुणी बसमध्ये चढताच आरोपी देखील मागून चढला आणि बसचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला. या घटनेनंतर तरुणीने तक्रार दाखल केली, असे महिला पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

हिमाचल प्रदेश : महाशिवरात्री साजरी करण्यावरून मुस्लिमांनी हिंदूंवर गोळीबार केला

‘दिल्ली लुटली’, कॅगच्या अहवालानंतर भाजपचा ‘आप’वर निशाणा! 

पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!

भारत- पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला केले ठार

पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपीची ओळख पटली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिरुरचा रहिवासी असून त्याच्यावर शिरुर शिक्रापूरमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  दरम्यान, या घटनेने पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण पुन्हा एकदा सिद्ध झाले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा