बुधवारी पहाटेच्या सुमारास, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना पठाणकोट सीमावर्ती भागात असलेल्या बीओपी ताशपाटन परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्या. वारंवार इशारा देऊनही संशयास्पद व्यक्तीने लक्ष न दिल्याने त्याला निष्क्रिय करण्यात आले.
बीएसएफच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या वेळी, बीएसएफ जवानांना पठाणकोट सीमावर्ती भागात बीओपी ताशपाटन येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयास्पद हालचाली दिसल्या. एक घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमेवरून सीमा ओलांडताना दिसला. त्यावेळी सतर्क सैन्याने त्याला आव्हान दिले पण त्याने लक्ष दिले नाही आणि तो पुढे जात राहिला. धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला निष्क्रिय केले. सध्या घुसखोराची ओळख पटवून आणि त्याचा हेतू शोधला जात आहे. सतर्क बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून पाक रेंजर्सकडे तीव्र निषेध नोंदवला जाईल,” अशी माहिती बीएफएफने दिली आहे.
At pre-dawn today, BSF troops observed a suspicious movement across the IB (International Border) in BOP Tashpatan, Pathankot border area & an intruder was observed crossing the IB; he was challenged by the alert troops but paid no heed & kept on moving; BSF troops sensing threat…
— ANI (@ANI) February 26, 2025
दरम्यान, गुप्तचर माहितीच्या आधारे, सीमा सुरक्षा दल मेघालयने आंतरराष्ट्रीय सीमा बेकायदेशीरपणे ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक व्यक्तींना रोखून अटक केल्याचे बीएसएफने २३ फेब्रुवारी रोजी एका निवेदनात म्हटले आहे. बीएसएफच्या जवानांनी पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर चार बांगलादेशी नागरिकांना अडवले. तर, बीएसएफ मेघालयच्या जवानांनी दक्षिण गारो हिल्समधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आणखी दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. बेकायदेशीर घुसखोरी आणि इतर सीमापार गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बीएसएफ मेघालयच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा:
मंदिरांची धार्मिक परंपरा मोडणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांवर यात्रांमध्ये बंदी घालणे योग्यचं!
द्वारकामधील भिडभंजन भवनेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग गेले चोरीला
प्रयागराजमध्ये भरला ‘चहाचा महाकुंभ’
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
कारवाईदरम्यान, चौथ्या आणि पहिल्या बटालियनच्या सुरक्षारक्षकांना सीमेवर संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्यांनी तातडीने कारवाई केली, ज्यामुळे सहा बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले.