27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरक्राईमनामावारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

Related

वारकरी दिंडीत भरधाव पिकअप घुसल्याने भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात सहा वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर, २० पेक्षा अधिक वारकरी जखमी झाले आहेत. अपघात जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज (२७ नोव्हेंबर) पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.

जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावरून हे वारकरी दिंडी घेऊन कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी आळंदीकडे पायी जात होते. पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत असताना एक भरधाव पिकअप घुसला. या अपघातामध्ये सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची दिंडी पायीच आळंदीकडे चालली होती.

यात जवळपास ३० वारकरी जखमी झाले होते. यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा