27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाथरारक पाठलाग करत नाशिक जिल्ह्यातून तस्कर पकडले, सरड्याच्या अवयवांची तस्करी

थरारक पाठलाग करत नाशिक जिल्ह्यातून तस्कर पकडले, सरड्याच्या अवयवांची तस्करी

चित्रपटातील दृश्याप्रमाणेच काढला माग

Google News Follow

Related

डीआयआरच्या पथकाने वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला नाशिक जिल्ह्यातील एका दुर्गम भागातून अटक केली आहे.या टोळीकडून डीआयआरने ७८१ बंगाल मॉनिटर लिजार्डचे (सरडा) अवयव ( हेमिपेनेस) आणि जवळपास २० किलो सॉफ्ट कोरल जप्त करण्यात आले आहे.

डीआयआर मुंबई विभागाच्या पथकाला गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वन्यजीव तस्करांची एक टोळी हातजोडी (बंगाल मॉनिटर लिझार्ड हेमिपेन्स) आणि मऊ कोरलसाठी ग्राहकाचा शोध  घेत आहे, या माहितीच्या आधारे डीआयआरच्या पथकाने बोगस ग्राहक बनून  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचला असता तस्करांनी  सावधगिरी बाळगत ३ तास डीआयआर च्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी ताटकळत ठेवले, अखेर या तस्करांनी या वस्तू विक्रीसाठी नांदगाव तालुक्यातील दुर्गम भाग निवडला व त्या ठिकाणी  अधिकारी यांना बोलाविण्यात आले.

 

दुर्गम भागात काटेरी झुडुपे व कच्चा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी चारचाकी वाहने जाऊ शकत नाही म्हणून डीआयआरच्या अधिकाऱ्यानी मोटारसायकल वरून जाण्याचा निर्णय घेतला, अधिकारी यांना ओळखू नये म्हणून त्यांनी आपल्या वाहनांना आंबेडकर जयंती निमित्त निळे झेंडे लावून उत्सवामध्ये मिसळून आपली ओळख लपवत आदिवासी भागात प्रवेश केला. दरम्यान काही जणांनी डीआयआरच्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर ३० ते ४० आदिवासी लोकांनी अधिकाऱ्यांना घेरून त्यांच्यवर दगडांचा मारा केला.

हे ही वाचा:

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!

मोदींकडून ‘संकल्प पत्रा’ची पहिली प्रत स्वीकारणारे रामवीर कृतकृत्य झाले!

…म्हणे भाजप संविधान बदलणार आहे !

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

ही संधी साधून तस्करांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु डीआयआरच्या अधिका-यांनी खडबडीत भागात अर्ध्या किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग  करून  तस्कराला पकडण्यात यश मिळविले आणि वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या अनुसूची-१  अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या ७८१ हातजोडी आणि १९.६ किलो मऊ कोरल देखील जप्त करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसह जप्त केलेले वन्यजीव वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये पुढील कारवाईसाठी महाराष्ट्र राज्य वन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. डीआयआरने जप्त केलेले  बंगाल मॉनिटर लिजार्डचे अवयव ( हेमिपेनेस) आणि जवळपास २० किलो सॉफ्ट कोरल औषधी असून त्याचा वापर औषधामध्ये केला जात असून या वस्तू खूप दुर्मिळ असल्याची माहिती डीआयआरच्या अधिकारी यांनी दिली .

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा