31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेषगँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

पोस्ट व्हायरल

Google News Follow

Related

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे ४.५५ वाजता गोळीबाराची घटना घडली.वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन दुचाकीस्वारांनी ६ राऊंड फायर करत तेथून पळ काढला. या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.दरम्यान, सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे.ज्यामध्ये त्याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे.

पहाटेच्या वेळी ही गोळीबाराची घटना घडली.हल्लेखोर गोळीबार करून फरार झाले.हल्ल्यावेळी सलमान खान आणि त्यांचे वडील घरीच वास्तव्यास होते.सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.मुंबई पोलीस हल्लेखोरांचा तपास घेत आहेत.दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली आहे.अनमोल हा सध्या यूएसमध्ये लपल्याची माहिती असून भारताला तो हवा आहे.दरम्यान, अनमोलच्या नावे एक सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहे ज्यामध्ये त्याने हल्लेची जबाबदारी घेतली आहे.

हे ही वाचा:

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

अवघ्या ५० रुपयांसाठी ग्राहकाने दुकानदाराच्या बोटाचा घेतला चावा!

अनमोल बिश्नोई पोस्टमध्ये लिहिले आहे की, ओम जय राम, जय गुरु जगदंबेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे.अन्यायाविरुद्धचा निर्णय जर लढाईने होणार असेल तर लढाई योग्य. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे.तुला आमची ताकद समजावी.आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे.यापुढे केवळ घरावर गोळीबार होणार नाही.

त्याने पुढे लिहिलंय की, ज्या दाऊद इब्राहिम आणि शोटा शकीलला तू देव मानले आहेस त्याच्या नावाचे दोन कुत्रे आम्ही पाळले आहेत. बाकी जास्त बोलण्याची मला सवय नाही. जय श्रीराम, जय भारत (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) गोल्डी ब्रार, रोहित गोडरा आणि काला जठारी, असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा