दिल्लीतील हौज काजी भागात ६५ वर्षीय महिलेवर तिच्याच मुलाने दोन वेळा बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाने तिला जबरदस्तीने बुरखा काढायला लावला, खोलीत कोंडले आणि मारहाण केली.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचे काही वर्षांपूर्वी परपुरुषाशी कथित संबंध असल्यामुळे तिच्या मुलाने तिला ही शिक्षा दिली. कारण त्याला या संबंधांविषयी शंका होती.
घटनेचा तपशील:
पीडित महिला तिच्या निवृत्त शासकीय सेवक पती, आरोपी मुलगा आणि एका मुलीसोबत हौज काजी येथे राहते. मोठी मुलगी लग्नानंतर जवळच राहत आहे. १७ जुलै रोजी महिला, तिचा पती आणि धाकटी मुलगी धार्मिक यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. आठ दिवसांनी आरोपीने वडिलांना वारंवार फोन करून कुटुंबाला दिल्लीला परत येण्यास भाग पाडले. त्याने वडिलांना आईपासून घटस्फोट घेण्यास सांगितले आणि बालपणी त्याला आईचे परपुरुषांशी संबंध असल्याचे कळाले होते, असा आरोप केला.
हे ही वाचा:
दिल्ली देशातील होणाऱ्या विकास क्रांतीची साक्षी
गोसेवेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशची प्रगती
युट्युबर एल्विश यादवच्या घरावर झाडल्या २४ गोळ्या
साहिबगंजमध्ये अवैध खाणकामावर कारवाई
१ ऑगस्ट रोजी कुटुंब परत आल्यानंतर आरोपीने आईवर हल्ला केला, तिला खोलीत कोंडले आणि बुरखा उतरवायला लावला. ११ ऑगस्टला त्याने कुटुंबीयांना सांगितले की, त्याला आईशी एकांतात बोलायचे आहे आणि त्यानंतर तिला खोलीत कोंडून बलात्कार केला. १४ ऑगस्टला पुन्हा आई झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरलेली महिला सुरुवातीला मोठ्या मुलीच्या घरी राहायला गेली, पण नंतर परत आली. अखेरीस तिने आपल्या धाकट्या मुलीला सर्व काही सांगितले, जिने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी प्रकरण नोंदवून आरोपी मुलाला अटक केली आहे. प्रकरण भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार) अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. तपास सुरू आहे.







