27.7 C
Mumbai
Tuesday, June 23, 2026
घरक्राईमनामाबदलापूरात BMW कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

बदलापूरात BMW कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

२५० किमी वेगाच्या थराराने घडली दुर्घटना

Google News Follow

Related

बदलापूर परिसर रविवारी पहाटे एका भीषण अपघाताने हादरून गेला. भरधाव वेगाने धावणाऱ्या BMW कारने नियंत्रण गमावल्याने झालेल्या या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की घटनास्थळी मृतांच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. बदलापूर – जेएनपीटीच्या निर्माणाधीन रस्त्यावर हा अपघात झालाय

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास BMW कार अत्यंत वेगाने बदलापूर परिसरातून जात होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कारचा वेग तब्बल २५० किलोमीटर प्रतितासांच्या आसपास होता. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार जोरदारपणे रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. धडकेनंतर कारने सलग अनेक कोलांटउड्या घेतल्या. काही क्षणांतच आलिशान BMWचा अक्षरशः चक्काचूर झाला.
हे ही वाचा:
हॉकी महिला नेशन्स स्पर्धेत भारताने जिंकले विजेतेपद

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ओमराजे जाणार शिंदेंसोबत

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, शेतकरी, पाऊस प्रश्न महत्त्वाचे

‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’

अपघाताचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना दिसलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते. कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता, तर दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. धडकेची ताकद इतकी प्रचंड होती की मृतदेह विद्रूप अवस्थेत आढळले. रस्त्यावर विखुरलेले अवयव पाहून उपस्थित नागरिकही हादरले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने गंभीर जखमी झालेल्या तरुणाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली.

प्राथमिक तपासात अतिवेग हेच या भीषण दुर्घटनेमागील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला असून वाहनाचा नेमका वेग, चालकाची स्थिती तसेच अपघातामागील इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. आवश्यक तांत्रिक तपासणीसाठी वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा