30 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरक्राईमनामाबार्ज दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलीस जाणार चार राज्यात

बार्ज दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलीस जाणार चार राज्यात

Related

तौकते वादळाच्या तडाख्यात अडकलेल्या पी ३०५ या बार्ज दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांपैकी चार जणांची अद्याप ओळख पटलेली नसून या चार मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी चार राज्यातील नातेवाईकांचे डीएनएचे नमुने घेण्यात येणार आहेत. नमुने घेण्यासाठी मुंबई पोलिसांची चार पथके विविध राज्यांत जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईतील अरबी समुद्रात असलेल्या ‘ओएनजीसी’ प्लांट मध्ये काम करणाऱ्या पी -३०५ ही बार्ज तौकते वादळाच्या तडाख्यामुळे दुर्घटनाग्रस्त होऊन या बार्जवर काम करणाऱ्यांपैकी ७१ कर्मचाऱ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर आठजण अदयापही बेपत्ता आहे. मुंबई, गुजरात आणि गोवा येथील समुद्रातून आतापर्यत ७१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यलो गेट पोलिसांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेऊन जे.जे रुग्णालयात ठेवले होते.

दरम्यान, यलो गेट पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ७१ मृतदेहांपैकी ६७ मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून ओळख पटवण्यात आलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यापैकी ४ मृतदेहांची ओळख अदयाप पटलेली नसून हे चारही मृतदेह जे.जे. रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आलेले आहेत. यलो गेट पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बार्जवर काम करणाऱ्यांची संपूर्ण माहिती शिपिंग कंपनीकडून गोळा केली आहे. जे.जे रुग्णालयाच्या शवगृहात हे चार मृतदेह आहेत. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी येलो गेट पोलिसांची चार वेगवेगळी पथके भोपाळ, पश्चिम  बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांत जाणार आहेत.

हे ही वाचा:

ओबीसी आरक्षणासाठी पुढाकार तर घ्या, आम्ही मदत करू

एकनाथ खडसेंनी केला होता पदाचा गैरवापर

करिनाच्या तिसऱ्या अपत्यामुळे ख्रिश्चन संघटना आक्रमक

ठेवींच्या उठाठेवींवरून शिवसेनेची पालिकेत कोंडी

बार्जवर या राज्यातील जे कर्मचारी काम करत होते, त्यांच्या सर्व नातेवाईकांची डीएनए चाचणी घेतली जाणार आहे. त्याची पडताळणी मृतदेहाच्या डीएनएशी केली जाणार आहे. बार्ज दुर्घटनेप्रकरणी यलो गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तसेच पापा शिपिंग या कंपनीच्या संचालकाचीही चौकशी होणार आहे. मात्र त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा