30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरक्राईमनामाशाळेत ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षा

शाळेत ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षा

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील घटना

Google News Follow

Related

राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील विद्यार्थिनीला शाळेत ‘जय श्री राम’ बोलण्यामुळे शिक्षेला सामोरे जावे लागले. शाळेत ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे शाळेतल्या शिक्षकाने या मुलीला थेट शिक्षा दिली. मुलीने याबद्दल आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर विद्यार्थीनीच्या वडिलांनी शाळेमध्ये याची तक्रार केली. यावर शाळा व्यवस्थापनाने त्यांना शाळेत ‘जय श्री राम’ बोलता येणार नाही, असं सांगितलं. या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून तपास सुरू आहे.

राजस्थानच्या सवाई माधोपुरमधील एका शाळेत विद्यार्थिनी गुड मॉर्निंग ऐवजी जय श्री राम म्हणाली म्हणून तिला शिक्षा करण्यात आली. चंचल योगी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. मुलगी चंचल योगी ही राधाकृष्णन स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकते. चार-पाच दिवसांपूर्वी मुकेश हे चंचल हिला सोडण्यासाठी शाळेच्या बसजवळ गेले होते. त्यावेळी मुलीने ‘जय श्रीराम’ म्हटलं. यावर नाराज होऊन कंडक्टर महावीर आणि शिक्षक तिला ओरडले. तसेच शाळेत पोहोचल्यावर मुलीला शिक्षा म्हणून हातवर करुन उभं करण्यात आलं.

पुढे घरी आल्यानंतर मुलीने सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांच्या कानावर घातला. माहिती मिळताच, मुकेश योगी दुसऱ्यादिवशी शाळेत पोहोचले. पण शाळेचे संचालक तीन ते चार दिवसापासून सुट्टीवर होते. चार दिवसानंतर मुकेश शाळेत गेले आणि त्यांनी संचालकांना सगळा प्रकार सांगितला. त्यावेळी प्रिंसिपल ममता माहेश्वरी यांनी त्यांना सांगितलं की, शाळेत मुलीला शिकवायच असेल, तर गुड मॉर्निंगच बोलाव लागेल.

हे ही वाचा:

एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश

एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

यानंतर मुलीच्या वडिलांनी एसपीकडे तक्रार केली असून महिला पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने काही कारवाई केली नाही, असं मुलीच्या वडिलांच म्हणण आहे. त्यांना शाळेत जय श्री राम बोलता येणार नाही, असं सांगितलं. मुलीला शाळेत सर्वांसमोर शिक्षा दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा