देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानस्थित कथित दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (१७ ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शाहजाद भट्टी नेटवर्कविरोधात १४ राज्यांमध्ये समन्वयाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत २०० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली असून, संभाव्य घातपाती कारवायांचा कट उधळण्यात आला.
अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी देशातील विविध ठिकाणी एकाचवेळी कारवाया करून या नेटवर्कची पाळेमुळे खणून काढली. स्वातंत्र्यदिनाच्या आधी संभाव्य दहशतवादी कारवाया रोखणे हा या ऑपरेशनचा प्रमुख उद्देश होता. शाह यांनी या कारवाईचे वर्णन दहशतवादाविरोधातील भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे उदाहरण म्हणून केले.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “आयएसआय-अनुदानित” गटाकडून स्फोटक उपकरणे (आयईडी), पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचे चिन्ह असलेले ग्रेनेड, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. तसेच, हे नेटवर्क “अनेक दहशतवादी कारवायांमध्ये” सामील होते, असेही त्यांनी सांगितले.
शाहजाद भट्टी हा पाकिस्तानस्थित गुंड ते दहशतवादी असा प्रवास केलेला व्यक्ती असल्याचा भारतीय तपास यंत्रणांचा आरोप आहे. त्याच्याशी संबंधित नेटवर्कविरोधात यापूर्वीही विविध राज्यांमध्ये कारवाया करण्यात आल्या आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित संशयितांकडून संवेदनशील ठिकाणांची रेकी, तरुणांची ऑनलाइन माध्यमातून भरती आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीसारख्या हालचाली केल्या जात असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी यापूर्वी केलेल्या तपासात या नेटवर्ककडून राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आल्याचे समोर आले होते.
Modi govt destroyed the ISI-backed terror group Shahzad Bhatti Network ahead of Independence Day and thwarted its plans for subversive attacks by arresting more than 200 operatives.
Indian security forces ripped apart the network by launching coordinated operations across…
— Amit Shah (@AmitShah) August 17, 2026
हे ही वाचा:
भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव
झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवा! राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र
एल निनोचे महासंकट; जागतिक अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरचा धोका?
एनआयएच्या तपासानुसार, भट्टीचा संबंध पंजाबमधील जालंधर येथील मार्च २०२५मधील ग्रेनेड हल्ला, तसेच हरियाणातील सिरसा महिला पोलीस ठाण्यावर नोव्हेंबर २०२५मध्ये झालेला हल्ला आणि अंबाला येथील जानेवारी २०२६च्या स्फोटाशी जोडला गेला आहे. सिरसा प्रकरणात भट्टीसह नऊ आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
