28.6 C
Mumbai
Tuesday, August 18, 2026
घरविशेषराम मंदिर देणगी चोरी प्रकरणात चंपत राय यांना क्लीन चिट

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात चंपत राय यांना क्लीन चिट

एसआयटीच्या अंतिम अहवालात माजी विश्वस्त अनिल मिश्रा यांचेही नाव नाही

Google News Follow

Related

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी महासचिव चंपत राय आणि माजी विश्वस्त अनिल मिश्रा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) आपल्या अंतिम अहवालात दोघांनाही क्लीन चिट दिली आहे. अंतिम अहवालात चंपत राय किंवा अनिल मिश्रा यांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने सोमवारी एसआयटीचा अंतिम अहवाल श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपवला. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राम मंदिरातील भाविकांच्या देणग्या आणि चढाव्याच्या रकमेच्या व्यवस्थापनात कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप जूनमध्ये समोर आला होता. ७ जून रोजी समाजवादी पक्षाचे नेते तेज नारायण ऊर्फ पवन पांडे यांनी मंदिरातील देणग्यांमधून सुमारे ५ ते ७.५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर प्रकरणाला मोठं राजकीय आणि प्रशासकीय स्वरूप आलं. यानंतर मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली. लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली हे पथक तयार करण्यात आले.

हे ही वाचा:

मदरशाच्या नावाखाली दहशतवादाला फंडिंग; जैशशी संबंधित एकाला अटक

बँक खाते भाड्याने देणं पडलं महागात; २५ कोटींचे व्यवहार उघड

सोरेन सरकार झुकलं; JSSC-CGLसह TDPLच्या परीक्षा रद्द

हिंद महासागरावर भारताचा ‘ड्रोन वॉच’; नौदलाला मिळणार MQ-9B सी गार्डियनची ताकद

एसआयटीने अयोध्येत १५ ते २० जूनदरम्यान प्राथमिक चौकशी केली. मंदिरात येणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया तपासण्यात आली. यात देणगीपेट्यांमधून रक्कम काढणे, रोख रकमेची मोजणी, पैसे साठवण्याची व्यवस्था, अकाउंटिंग प्रक्रिया, प्रवेश नियंत्रण आणि सीसीटीव्ही देखरेख अशा विविध बाबींचा समावेश होता. प्राथमिक चौकशीत रोख रक्कम आणि भाविकांकडून मिळणाऱ्या मौल्यवान वस्तूंच्या व्यवस्थापनात प्रथमदर्शनी काही अनियमितता आढळल्याचे एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. देणगी चोरीचे आरोप समोर आल्यानंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा या दोघांनीही २७ जून रोजी ट्रस्टमधील आपल्या पदांचा राजीनामा दिला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा