28 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरक्राईमनामापित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!

पित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!

आरोपी नराधम पित्याला अटक

Google News Follow

Related

वडील आणि पित्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईतील ताडदेव येथे उघडकीस आली आहे. ४२ वर्षीय पित्याकडून मागील काही वर्षांपासून १७ वर्षीय मुलीचे लैगिंग शोषन होत असल्याची संतापजनक घटना समोर आली. बापाच्या या कृत्याला कंटाळून मुलीने घर सोडले होते, पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिच्याकडे केलेल्या चौकशीत हा पित्याचे घाणेरडे कृत्य समोर आले. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी पित्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पित्याला अटक करण्यात आली आहे.

ताडदेव पोलीस ठाण्यात २ ऑक्टोबर रोजी १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तीला कक्ष कार्यालयात आणून चौकशी केली असता, तिच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

पीडित मुलगी ही महालक्ष्मी येथे आई वडील आणि मोठ्या भावासोबत राहण्यास आहे, आई मानसिक रुग्ण आहे. पीडित मुलीचे वडील कंत्राटी कर्मचारी आहे, मागील काही वर्षांपासून पीडित मुलीचे पित्याकडून लैगिंग शोषण केले जात होते, हा प्रकार २०१९ पासून सुरू होता, भीतीपोटी मुलगी वडिलांचा हा त्रास सहन करीत होती, वडिलांचे हे कृत्य मुलीने वडिलांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केले होते, व मित्राला तो व्हिडीओ पाठवून वडिलांकडून होत असलेल्या त्रासातून सुटका करण्याची विनंती केली होती.

हे ही वाचा : 

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद

अमितभाई कल किसने देखा? आताच निर्णय घ्या…

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

२ ऑक्टोबर रोजी अखेर वडिलांच्या या लैगिंग शोषण ला कंटाळून अखेर पीडित मुलीने घर सोडले आणि मित्राकडे निघून गेली होती. मुलगी घर सोडून गेल्यामुळे पित्याने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलीने दिलेल जबाब आणि पित्याच्या कृत्याच्या व्हिडीओच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने पित्याचा शोध घेऊन बुधवारी रात्री पित्याला ताब्यात घेऊन ताडदेव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ताडदेव पोलिसांनी पित्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करून पित्याला अटक करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा