31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरक्राईमनामाचकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता

चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट होता

सुरक्षा दलाचा दावा

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात कांकेर येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सर्व २९ माओवाद्यांची सुरक्षा दलांनी ओळख पटवली आहे. हे सर्व माओवादी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या माओवाद्यांच्या विविध गटाचे सदस्य होते. त्यामुळे ते येथे एकत्र आले, याचा अर्थ बस्तरमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, असा दावा सुरक्षा दलाने केला आहे. त्याचवेळी छत्तीसगड पोलिसांनी राज्याच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाल्याची माहिती दिली.

‘आम्हाला शंका आहे की निवडणुकीच्या अगोदर एमएमसी (मध्य प्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड)मधील विविध गटांचे हे माओवादी सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी राज्यात एकत्र आले होते,” असे तपासाबाबत माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. हे सर्व माओवादी छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील होते.

माओवादी विभागीय गटांमध्ये विभागले गेले आहेत. ते विशिष्ट प्रदेशांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ, एमएमसी समिती केवळ राजनांदगावपर्यंत कार्य करते, जे कांकेरमधील चकमकीच्या ठिकाणापासून सुमारे १५० किमी अंतरावर आहे.
‘त्यांना जंगलात, सुमारे २०x२०चौरस किमीच्या परिसरात, काही आठवडे किंवा कदाचित एक महिन्यासाठी अडवले गेले होते. आमच्या सैन्याला चकमकीपूर्वी काही दिवस सतत त्यांच्याबद्दल माहिती मिळत होती. ते निवडणुकीदरम्यान सैन्यावरील हल्ल्यांशी संबंधित बैठका घेत होते,’ अशी माहिती दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

कांकेरमध्ये २६ एप्रिल रोजी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी परतारपूर गावचे क्षेत्र कमांडर सुखलाल, श्रीकांत आणि जुगनी या तीन प्रमुख व्यक्तींची ओळख पटवली. हे प्रदेशाचे क्षेत्रीय कमांडर होते, ज्यांच्यावर माओवादी कमांडर शंकर राव यांचे नियंत्रण होते. सुरक्षा दलाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या २९ जणांमध्ये त्याचा समावेश होता. त्यापैकी किमान १० एमएमसी झोनल कमिटीचे सदस्य असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील गडचिरोली येथील सुरेखा या महिलेचे राज्याच्या पोलिस ठाण्यांत डझनभर गुन्ह्यांमध्ये नाव आहे. तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील रीटा ही देखील या विभागीय गटाची सदस्य होती.

कांकेर जिल्ह्यात छत्तीसगड पोलिस आणि सीमा सुरक्षा दल यांच्या संयुक्त सैन्यासोबत झालेल्या चकमकीत हे बंडखोर ठार झाले. या चकमकीत तीन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले. ‘गोळीबार थांबल्यावर पाच किंवा सहा सशस्त्र महिला माओवादी जंगलाकडे पळताना दिसल्या. त्या दुसऱ्या राज्यात पळून गेले असण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट

बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न

यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही!

‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’

छत्तीसगड पोलिसांचे माजी विशेष महासंचालक (नक्षलविरोधी मोहीम) आर के विज यांनी एमएमसी (मध्य प्रदेश-महाराष्ट्र-छत्तीसगड) केडरचे माओवादी येथे का होते, याची चौकशी करण्याची गरज अधोरेखित केली. ‘आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आश्चर्यकारक नाही. तथापि, एमएमसी कॅडर का होते, हा चौकशीचा विषय आहे,’ असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा