31 C
Mumbai
Friday, March 24, 2023
घरक्राईमनामा"गुम है किसी के प्यार में" या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक

“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध मालिकेचा सेट जळून खाक

जीवितहानी नाही पण लाखोंचे नुकसान

Google News Follow

Related

“गुम है किसी के प्यार में” या प्रसिद्ध हिंदी मालिकेचा सेटला भीषण आग लागल्यामुळे पूर्ण सेट जाळून खाक झाला असून त्यांत लाखोंचे नुकसान झाले आहे, पण कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त आहे. या मालिकेच्या आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘गुम है किसी के प्यार में’  हि लोकप्रिय मालिका सध्या बऱ्याच काळापासून चांगल्या टीआरपीवर आहे. https://twitter.com/ANI/status/1634163791402266625?t=j_LegJEuNKWbzRKDXF76aA&s=08 प्रेक्षकांना हि मालिका भरपूर आवडत आहे. या मालिकेचा सेट हा मुंबईतील गोरेगाव पूर्व इथल्या फिल्मसिटी मध्ये लावण्यात आला आहे. या सेटवर आज दुपारी अचानकच आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे सेटचे बरेचसे नुकसान झाले आहे. जवळजवळ ६० टक्के भाग हा जळून खाक झाला आहे. सर्व कलाकार आणि सर्व क्रूला सुखरूप बाहेर काढले आहे. पण या सेटवरील आगीमुळे आजूबाजूच्या सेटवरील भागाचे सुद्धा नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. हे ही वाचा: आगामी निवडणुकांसाठी पंचामृत! पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन नागालँडमध्ये पवारांनी केली त्याच रणनीतीची पुनरावृत्ती अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी – विरोधक भिडणार सोशल मीडियावर या आगीचा व्हिडिओ बघून आग किती भीषण होती याची कल्पना येत आहे. अचानक लागलेल्या या आगीनंतर सर्वत्र एकाच गोंधळ उडाला आणि सगळे जण घाबरून इकडे तिकडे पळू लागले. या आगीच्या अपघाताची बातमी त्वरित अग्निशमन यंत्रणेला दिल्यामुळे अग्निशमन दलाककडून हि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, निल भट्ट, आयेशा सिंग , आणि ऐश्वर्या शर्मा यामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. सध्या हि मालिका प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरत आहे. या मालिकेबरोबरच अनुपमा हि मालिका सध्या सर्वात जास्त बघितली जाते म्हणूनच अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रेक्षक चिंतेत आहे.आहेत.  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,879चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
65,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा