28 C
Mumbai
Tuesday, September 15, 2026
घरक्राईमनामाइमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना

एअर इंडियाला नोटीस

Google News Follow

Related

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेशी संबंधित गंभीर चूक समोर आली आहे. ३ इटालियन नागरिकांनी अनिवार्य इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच दिल्लीहून म्युनिकला जाणारे विमान पकडले. या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

संबंधित घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी घडली. हे तिन्ही प्रवासी अमृतसरहून एअर इंडियाच्या AI-1115 या विमानाने रात्री १२.५० वाजता दिल्लीला पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ते लुफ्थान्साच्या LH-763 या दिल्ली-म्युनिक विमानात बसले आणि पहाटे १.४५ वाजता म्युनिकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, भारतातून बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आवश्यक इमिग्रेशन तपासणी पूर्ण केली नव्हती.

या तिघांना अमृतसरमध्येच अमृतसर-दिल्ली प्रवासासाठी डोमेस्टिक बोर्डिंग पाससोबत म्युनिकच्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बोर्डिंग पास देण्यात आले होते. केंद्राच्या म्हणण्यानुसार, हब-अँड-स्पोक पद्धतीच्या नियमांनुसार प्रवाशांना योग्य प्रक्रियेतूनच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुढे पाठवणे अपेक्षित होते. दिल्लीला पोहोचल्यानंतर या प्रवाशांना इमिग्रेशन काऊंटरकडे नेण्याऐवजी आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर क्षेत्राकडे वळवण्यात आले. त्यामुळे ते अनिवार्य इमिग्रेशन तपासणी न करताच म्युनिकच्या विमानापर्यंत पोहोचले.

हे ही वाचा:

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य, उद्धव ठाकरेंची नावे

चक्क कट्टर विरोधक यशवंत सिन्हा मोदींवर खुश

भारतीय संघाने जिंकले ज्युनियर महिला आशिया कपचे विजेतेपद

२४ कॅरेट सोन्याचे मोदक फक्त २७ हजार रुपये किलो

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणात एअर इंडियाच्या प्रक्रियेत ५ नियमभंग किंवा त्रुटी झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये बोर्डिंग पास जारी करण्याची प्रक्रिया, प्रवाशांचे योग्य विभाजन, प्रवेश नियंत्रण तसेच हब आणि स्पोक विमानतळांवरील मॉनिटरिंग यंत्रणेतील त्रुटींचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, कंपनीला सात दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रक्रियेत नेमके कसे पाठवण्यात आले, बोर्डिंग पास कोणी जारी केले आणि संबंधित यंत्रणांनी योग्य तपासणी का केली नाही, याची माहितीही मागवण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा