30 C
Mumbai
Saturday, June 1, 2024
घरक्राईमनामाकुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण

कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण

हलान जंगल परिसरात शोध मोहीम सुरू

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी शोध मोहिमेदरम्यान जवानांवर गोळीबार केला यात हे तीन जवान जखमी झाले होते. अखेर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, सुरक्षा दलाच्या हालचाली पाहता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. अखेर या शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या गोळीबाराला जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले आणि पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ट्विटकरून दिलेल्या माहितीनुसार, “कुलगाममधील हलानच्या उंच जंगली भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी ४ ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले.” दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जानेवारीच्या अखेरीस अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना; २५ हजार संतांना देणार आमंत्रण

नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता

वसुलीच्या उद्योगावरही एखादी श्वेतपत्रिका हवी

यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबाची (एलईटी) शाखा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, १० राउंड पिस्तूल, २५ एके-४७ रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
158,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा