32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाबंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या; TMC नेत्याचा मुलगा आरोपी

बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या; TMC नेत्याचा मुलगा आरोपी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तृणमूल काँग्रेस नेत्याच्या मुलाचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी, १० एप्रिलला ही माहिती दिली. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपींवर तक्रार न करण्यासाठी  दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय मुलीवर पंचायत सदस्याच्या मुलाने सामूहिक बलात्कार केला होता, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात तृणुमूल काँग्रेसचा नेता समर ग्वाला याचा मुलगा ब्रिजगोपाल ग्वाला (२१) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या सात दिवसांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधीच कुटुंबीयांनी मुलीवर अंतिम संस्कार केले आहेत. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३०२ , २०४ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, ब्रिजगोपाल आणि त्याच्या मित्रांनी मुलीला ४ एप्रिल रोजी वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. त्यानंतर या तरुणांनी दारू पिऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. तर ब्रिजगोपाल आणि त्याचे मित्र पीडितेच्या मृतदेहावर पीडितेच्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणत होते.

हे ही वाचा:

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

झारखंडमध्ये रोपवेच्या ट्रॉली धडकून अपघात; तीन जणांचा मृत्यू

पोलिसात तक्रार न करण्यासाठीसुद्धा आरोपींनी धमकी दिल्याच्या असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी शनिवारी,९ एप्रिल रोजी हंसखळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि दोषींना अटक करण्याची मागणी केली,” पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा