तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात थेट तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावे समोर आली आहेत. पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, असे आवाहन पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केले आहे.
विपीन शिंदे म्हणाले, सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवावी, तुळजापूर हे पुजाऱ्यांचे गाव आहे, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.
हे ही वाचा :
रेपो दरात २५ आधार अंकांची कपात
मालेगावच्या मशिदीत मुस्लिम मौलवींनी काय भूमिका मांडली?
पंतप्रधान मोदींनी केला ‘णमोकार महामंत्र’ जप
सर्वसामान्यांना दिलासा; सलग दुसऱ्यांदा रेपो दरात ०.२५ टक्के कपात
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांचे नाव आल्याने आता त्यांच्यावर मंदिर बंदी करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर पुजारी व मंदिर प्रशासनात वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल झाले असून अनेकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ३५ जणांना आरोपी करण्यात आले असून, ८० जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रवेशबंदीची कारवाई होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.