प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री गार्गी मौसिक पटेल सोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी अभिनेत्रीकडून वॉशिंग मशीन, ऑडिओ रिसीव्हर, अॅम्प्लीफायर आणि डिशवॉशर यासारख्या घरगुती वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने ४५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये, अभिनेत्रीने तिच्या घरात असलेले वॉशिंग मशीन विकण्यासाठी तीने फेसबुक अकाउंटवर जाहिरात टाकली होती. त्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीशी संपर्क साधला आणि तिने व्यवहाराची चर्चा करण्यासाठी तिचा मोबाईल नंबर शेअर केला. १८ एप्रिल रोजी एका व्यक्तीने अभिनेत्रीशी संपर्क साधला आणि वॉशिंग मशीन खरेदी करण्याबद्दल बोलले.
२४ एप्रिल रोजी तरुण नावाच्या या व्यक्तीने पुन्हा अभिनेत्रीला फोन करून सांगितले की त्याचा जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे आणि जर माझ्याकडे इतर वस्तू असतील तर तो त्या देखील खरेदी करू इच्छितो. यानंतर, अभिनेत्रीने त्याच्यासोबत ऑडिओ रिसीव्हर/अॅम्प्लीफायर आणि डिशवॉशरचे फोटो देखील शेअर केले. अभिनेत्रीने त्या तरुणाला या सर्वांची किंमत ४०,००० रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर, त्या तरुणाने पेमेंट करण्यासाठी अभिनेत्रीला तिचा अकाउंट नंबर मागितला, जो तिने शेअर केला.
हे ही वाचा :
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून वसई विरार मधील विकासकाला धमकी!
हे भय ट्रम्प यांना छळत राहणार!
कुणालाही जमले नाही, पण आम्ही अमेरिकन तळांना केले लक्ष्य!
यानंतर, त्या तरुणाने अभिनेत्रीच्या अकाउंटवर ३५,००० रुपये पाठवले, तर उर्वरित ५,००० रुपये लवकरच पाठवले जातील असे सांगितले. यानंतर, अभिनेत्रीला पुन्हा एक मेसेज आला, तो मेसेज पाहण्यापूर्वीच, त्या तरुणाने अभिनेत्रीला फोन केला आणि सांगितले की त्याने चुकून ५,००० रुपयांऐवजी ५०,००० रुपये पाठवले आहेत. त्या तरुणाने अभिनेत्रीला पैसे परत करण्यास सांगितले आणि त्याच्या आणि तिच्या पतीच्या बँक खात्यातून ४५,००० रुपये तिने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले.
यानंतर, तो तरुण वेगवेगळ्या प्रकारे अभिनेत्रीला पैसे परत करेन असे सांगून टाळाटाळ करत राहिला. जेव्हा तिने कॉल उचलणे बंद केले तेव्हा अभिनेत्रीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने वरळी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
