28 C
Mumbai
Saturday, March 21, 2026
घरक्राईमनामावरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी 'या' दोघांना घेतले ताब्यात

वरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात

Google News Follow

Related

वरळी लिफ्ट दुर्घटनाप्रकरणी नारायण मल्हार जोशी मार्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा बांधकाम साईट सुपरवायझर स्वप्नील म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११९ समोर असणाऱ्या ललित अंबिका विकासक यांच्याकडून बांधकाम करण्यात आलेल्या श्री लक्ष्मी को-ऑप- हौसिंग सोसायटीच्या वाहन पार्किंग बांधकामाच्या ठिकाणी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास १७ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ५ मजुरांचा मृत्यू झाला होता, तर एक मजूर गंभीररीत्या जखमी झाला आहे.

हे ही वाचा:
तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज

पंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला

उध्वस्त कोकणाला सावरण्यासाठी ठाणेकर सरसावले

या दुर्घटनेप्रकरणी नारायण मल्हार जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शनिवारी साईट सुपरवायझर आणि कंत्राटदार विरुद्ध मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

अविनाश दास (३२), भरत मंडल (२८)चिन्मय मंडल (३३) आणि दोन अनोळखी मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला असून लक्ष्मण मंडल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. वरळीतील शंकरराव फड पथ मार्ग हनुमान गल्ली या ठिकाणी असलेल्या अंबिका मिलच्या जागेवर ललित अंबिका या बांधकाम विकासकाकडून २०मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा एक भाग रहिवाशांसाठी असून एक भाग व्यवसायिक आहे. दोन्ही इमारतीचा मधला भाग हा वाहन पार्किंगसाठी बनवण्यात आलेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा