भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत दोन बांगलादेशी मासेमारी नौका ताब्यात घेतल्या आहेत. १७ डिसेंबर रोजी, तटरक्षक दलाच्या जहाज “अनमोल”ने बंगालच्या उत्तर उपसागरात ३५ कर्मचाऱ्यांसह दोन बांगलादेशी मासेमारी नौका ताब्यात घेतल्या. बांगलादेशी कर्मचारी भारतीय विशेष आर्थिक क्षेत्र (EEZ) मध्ये बेकायदेशीर मासेमारी करत होते. बांगलादेशी मच्छिमार भारताच्या सागरी क्षेत्र (विदेशी जहाजांद्वारे मासेमारीचे नियमन) कायदा, १९८१ चे उल्लंघन करताना आढळून आले.
भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) मते, सक्रिय मासेमारी उपकरणे आणि सुमारे ५०० किलोग्रॅम मासे पकडले गेल्याने भारतीय पाण्याच्या आत मासेमारी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. आयसीजीने बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर, १७ डिसेंबर रोजी बांगलादेशी मच्छिमारांना पश्चिम बंगालमधील फ्रेजरगंज मरीन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले . या प्रकरणातील पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
हेही वाचा..
बांगलादेशमध्ये भारतविरोधी निदर्शनांनंतर भारतीय व्हिसा अर्ज केंद्रे बंद
विकसित भारत – जी राम जी विधेयकाला लोकसभेत मंजुरी!
मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
ट्रम्प यांचा स्वतःची पाठ थोपटण्याचा विक्रम!
उल्लेखनीय म्हणजे, आयसीजी वारंवार भारतीय ईईझेडमध्ये बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या बांगलादेशी मासेमारी नौकांना रोखत आहे. गेल्या तीन महिन्यांत, भारतीय तटरक्षक दलाने एकूण १७० क्रू मेंबर्स असलेल्या आठ बांगलादेशी मासेमारी नौकांना ताब्यात घेतले आहे. नोव्हेंबरमध्ये, आयसीजीने बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागातील भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (ईईझेड) बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या २८ क्रू सदस्यांसह एक बांगलादेशी मासेमारी बोट पकडली.







