28.8 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेतील व्हिसा संकटात वाढ; H-1B  मुलाखती ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या

अमेरिकेतील व्हिसा संकटात वाढ; H-1B  मुलाखती ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुढे ढकलल्या

शेकडो भारतीय भारतीयांना करावा लागतो अनिश्चततेचा सामना

Google News Follow

अमेरिकेत काम करण्याची तयारी केलेल्या भारतीय नोकरदार वर्गाचे व्हिसा संकट आणखी वाढताना दिसत आहे. H-1B  आणि H-4 व्हिसा मुलाखतींच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो भारतीय अर्जदारांनी आता त्यांच्या मुलाखती ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. यापूर्वी, या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी-मार्च २०२६ पर्यंत पुन्हा वेळापत्रकानुसार आखण्यात आल्या होत्या. सततच्या विलंबाने अर्जदार अडकले आहेत, त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या नोकऱ्या अनिश्चित आहेत.

डेक्कन क्रॉनिकलनुसार, अनेक अर्जदारांनी नोंदवले की त्यांच्या मुलाखतीच्या तारखा पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.अमेरिकेतील ‘द अमेरिकन बाजार’ या वृत्तसंस्थेने सांगितले आहे की, इमिग्रेशन वकिलांसमोर अशाही काही घटना समोर आल्या आहेत जिथे जानेवारी २०२६ च्या मध्यात होणाऱ्या मुलाखती थेट ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ज्या अर्जदारांचे वेळापत्रक बदलण्यात आले ते जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या मुलाखती रद्द करण्याची विनंती करत आहेत जेणेकरून त्यांचे अर्ज पूर्वीच्या तारखांना सामावून घेता येतील. तथापि, अशा प्रयत्नां यशा मिळाल्याचे दिसत नाही.

अलिकडच्या आठवड्यात, अमेरिकन दूतावासांनी मोठ्या संख्येने अर्जदारांना कळवले आहे की डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणाऱ्या मुलाखती आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होतील. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया गतिविधींच्या छाननी प्रक्रियेमुळे हा विलंब होतो आहे.

दरम्यान, अमेरिकेबाहेर असलेल्या अनेक नोकरदारांना अडचणी येत आहेत. काहींनी आधीच आंतरराष्ट्रीय प्रवास बुक केला होता, मंजूर सुट्ट्या घेतल्या होत्या किंवा व्हिसा स्टॅम्पिंगसाठी भारतात आले होते, परंतु नंतर त्यांना कळले की त्यांच्या मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. परदेशात अडकलेल्या अर्जदारांसाठी परिस्थिती आणखी भयानक आहे, कारण ते दीर्घकाळ त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे राहिले आहेत आणि त्यांच्याकडे अमेरिकेत परतण्याचे पर्याय मर्यादित आहेत.

डेक्कन क्रॉनिकलने हैदराबादमधील अमेरिकन कॉन्सुलेट जनरलच्या प्रवक्त्याचे म्हणणे म्हणणे मांडले, “परराष्ट्र विभाग नियमितपणे संसाधनांच्या उपलब्धतेनुसार मुलखतीचे वेळापत्रक बदलतो. प्रभावित व्हिसा अर्जदारांना कोणत्याही बदलांची थेट सूचना दिली जाईल.”

नवीन तारखांची बातमी पसरताच, भारतीय डायस्पोरा आणि ऑनलाइन मंचांवर भारतीयांची चिंता झळकते आहे, त्यांचा संताप वाढला आहे. पूर्वी, F-1 विद्यार्थी व्हिसातील विलंब आणि वर्क व्हिसा शुल्क वाढवण्याच्या प्रस्तावांचाही भारतीय समुदायावर परिणाम झाला होता. आता, H-1B मुलाखती २०२६ च्या शेवटच्या महिन्यांत परत ढकलण्यात आल्याने, अनेक भारतीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे की त्यांचे करिअर आणि कौटुंबिक जीवन अनिश्चिततेत ढकलण्यात आले आहे, लवकर सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाहीत.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये भारतविरोधी निदर्शनांनंतर भारतीय व्हिसा अर्ज केंद्रे बंद

धुक्यात हरवला टी २० सामना!

ज्या मैदानावर गवत कापायचा, तिथे नाथन लायनने मॅकग्राचा विक्रम मोडला

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा