30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरक्राईमनामाइसिसमध्ये मुस्लिम तरुणांना सामील करणाऱ्या त्या दोघांना ८ वर्षांची सजा

इसिसमध्ये मुस्लिम तरुणांना सामील करणाऱ्या त्या दोघांना ८ वर्षांची सजा

Google News Follow

Related

इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीचा पुरस्कार केल्याच्या प्रकरणात मालाड, मालवणीमधील दोन्ही आरोपी तरुणांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने विशेष एनआयए कोर्टाने दोघांना ८ वर्षांची शिक्षा ठोठावली.

इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रवृत्त केल्याबद्दल या दोघांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांवर १० हजारांचा दंडही लावण्यात आला असून जर त्यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेत ३ महिन्यांची वाढ करण्यात येईल.

या दोन तरुणांची नावे रिझवान अहमद व मोहसिन इब्राहिम सय्यद अशी आहेत. बुधवारी या दोघांनाही दोषी धरण्यात आले होते.

भारताच्या मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी इसिस, आयएस, आयएसआयएल या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना हे दोघेही आमीष दाखवत असत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) म्हटले आहे.

हे ही वाचा:

मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार

महाराष्ट्रात दोन वेगळे कायदे आहेत काय?

ट्विटरवर गाजला मराठी राबडी देवी हॅशटॅग

‘रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार’

 

यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या एटीएसने ३० डिसेंबर २०१५ला प्रथम काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १८ मार्च २०१६मध्ये एनआयएने पुन्हा यासंदर्भात गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास पूर्ण झाल्यावर एनआयएने १८ जुलै २०१६ला आरोपपत्र दाखल केले. त्यात त्यांना असे आढळले की, हे दोघेही मालवणीमधील मुस्लिम तरुणांना या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करत असत. इस्लामसाठी लढणारे आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान करणारे फिदायिन तरुण म्हणून त्यांची नियुक्ती केली जात असे. त्यांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी हिजरतला पाठविले जात असे.

दोषी मोहसीन सय्यदने यापूर्वीच साडेपाच वर्षांचा आणि रिझवान अहमदने सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा