29.8 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामाहॉस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

हॉस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

चंदीगड विद्यापीठात धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

चंदीगड विद्यापीठात धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने इतर मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढून तरुणाला पाठवून दिले आणि हे व्हिडीओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबंधित बाब समोर येताच काही तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

चंडीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीने ६० मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तिने तो व्हिडीओ एका तरुणाला पाठवून दिला. हे व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावर व्हायरल केले. माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून हॉस्टेलमधील तरुणींचे व्हिडिओ बनवले जात होते. संबंधित व्हिडीओ तरुणींनी पाहताच त्यातील आठ तरुणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाचा घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनांवर हल्ला करण्यास सुरुवात केला आणि यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. संबंधित तरुण हा शिमला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा