29 C
Mumbai
Sunday, September 25, 2022
घरविशेषमोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा जागतिक विक्रम

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रक्तदान मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ८० हजारांहून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे एका दिवसात ८० हजारांहून अधिक लोकांनी रक्तदानात सहभागी होऊन जागतिक विक्रम केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.

अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी भारतातील तीनशे शहरांमध्ये ५५६ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. मनसुख मांडविया यांनी आयोजित शिबिरात रक्तदान केले. रक्तदान अमृत महोत्सवात रक्तदान करण्यासाठी त्यांनी आरोग्य सेतू अँप किंवा ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. एका दिवसात ८७ हजार लोकांनी रक्तदान केले आहे. मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान अमृतमहोत्सव अंतर्गत, आतापर्यंत ८७ हजारांहून अधिक लोकांनी रक्तदान केले आहे.जो एक नवीन जागतिक विक्रम केला आहे. आपल्या प्रिय पंतप्रधानांना देशाकडून मिळालेली ही अमूल्य भेट आहे, असे मांडविया यांनी सांगितले आहे.

रक्तदानासाठी १ लाख ९५ हजार ९२५ जणांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत देशभरात ६ हजार १३६ शिबिरांना परवानगी देण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट एका दिवसात एक लाख युनिट रक्त गोळा करण्याचे आहे. १ ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे.

हे ही वाचा:

होस्टेलमधील ६० मुलींचे व्हिडीओ व्हायरल, आठ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०२१ च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे पंधरा दशलक्ष युनिट रक्त आवश्यक आहे. भारतात दर दोन सेकंदात एका रुग्णाला रक्ताची गरज असते आणि प्रत्येक तीनपैकी एकाला आयुष्यात कधी ना कधी रक्ताची गरज असते, अशी माहिती मांडविया यांनी दिली आहे. तसेच त्यांनी शिबिरात देणगीदारांची भेट घेऊन त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
39,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा