31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामामंदिरावरील भगवा ध्वज उतरवला...बरेलीत एकाला अटक

मंदिरावरील भगवा ध्वज उतरवला…बरेलीत एकाला अटक

उत्तर प्रदेशमधील बरेली पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी कारवाई करत एकाला अटक केली आहे.

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील बरेली पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी कारवाई करत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका गाव प्रमुखाला अटक केली आहे. मोहम्मद आरिफ उर्फ ​​गुड्डू असे आरोपीचे नाव असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिकमपूर गावचा प्रधान मोहम्मद आरिफ याने मंदिरावरील भगवा ध्वज उतरवून इस्लामिक ध्वज लावल्याचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. यामध्ये मंदिराचा ध्वज खाली पाडून त्याजागी इस्लामिक ध्वज फडकवण्यात आला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी बरेली जिल्हा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राज कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेली पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने हा व्हिडिओ भोजीपुरा पोलिस स्टेशनला पाठवला, जिथे आरिफ याने तो अपलोड केल्याचे आढळले. तर, उपनिरीक्षक मोदी सिंग यांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम २९५ अ (धार्मिक भावना भडकवणे), १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!

उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!

मशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग

डोंबिवलीतल्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

पोलिसांनी दिलेल्या अतिरिक्त माहितीनुसार, आरिफवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, बंडखोरी आणि इतर अनेक कलमांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरिफ उर्फ ​​गुड्डू याला बैकुंठापूर गेटजवळ अटक केली. त्यानंतर त्याने फेसबुकवर व्हिडिओ अपलोड केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपीवर कायदेशीर कारवाई करत त्याला न्यायालयात हजर केले असता तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा