28.6 C
Mumbai
Tuesday, July 7, 2026
घरक्राईमनामासावधान! पाकिस्तानी 'गोरी'सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक

सावधान! पाकिस्तानी ‘गोरी’सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक

एफडीएचा नागरिकांना इशारा

Google News Follow

Related

राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या प्रयोगशाळा चाचणीत तीन लोकप्रिय ब्युटी क्रीम ‘अमानक’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. या उत्पादनांमध्ये मानवी आरोग्यास घातक ठरणारे पारा (Mercury) आणि शिसे (Lead) यांसारखे जड धातूंचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. मुंबई गुन्हे शाखेने काही आठवड्यापूर्वी चेंबूर येथे केलेल्या कारवाईत पाकिस्तान येथे गोरी क्रिम जप्त करून विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती.

एफडीएच्या तपासणीत खालील उत्पादने घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे:

  • गोरी ब्युटी क्रीम (Goree Beauty Cream)
  • फेस फ्रेश गोल्ड – ब्युटी क्रीम आणि ब्युटी सीरम (Face Fresh Gold)
  • गोल्डन स्टार ब्युटी क्रीम (Golden Star Beauty Cream)

विशेष म्हणजे, या उत्पादनांवर निर्मात्याचे नाव, पत्ता यांसारखी महत्त्वाची माहिती नाही, तसेच बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेटचाही अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासनाने खालील निर्देश जारी केले आहेत:

  • वरील उत्पादनांचा वापर, खरेदी किंवा वाटप त्वरित थांबवावे.
  • किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी या उत्पादनांची विक्री, साठवणूक आणि प्रदर्शन त्वरित बंद करावे.
  • तसेच, ज्यांच्याकडे साठा असेल, त्यांनी तो त्वरित परत मागवून एफडीए कार्यालयाला अहवाल द्यावा.

हे ही वाचा:

भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास

दोन दिवसांच्या पावसानंतर मुंबईला उसंत; जनजीवन अजूनही मंदावलेले

थायलंडमध्ये सापडली २ हजार वर्षे जुनी भारतीय ब्राह्मी लिपी असलेली सोन्याची अंगठी

होर्मुझ सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले

या उत्पादनांच्या विक्रीबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी खालील संपर्क साधनांवर त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे: नेहमी अधिकृत ठिकाणाहूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करा आणि उत्पादनावर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर, उत्पादन तारीख व एक्सपायरी डेट असल्याची खात्री करूनच खरेदी करा, असे आवाहन सह-आयुक्त व औषध नियंत्रक जी. आर. रोकडे यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा