नोएडा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिलेला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडून लग्न करणाऱ्या मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक केली आहे. राजा मियाँ उर्फ एहसान असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
महिलेच्या आईने तिच्या मुलीच्या पुनर्प्राप्तीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी सहा वर्षांच्या मुलाची आई असलेल्या महिलेचा शोध घेऊन तिला चेन्नईला परत आणले. या कारवाई दरम्यान, नोएडा पोलिसांनी २८ वर्षीय महिलेला इस्लाम स्वीकारण्यास आणि तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपी राजा मियाँ उर्फ एहसानसह तीन जणांना अटक केली.
माहितीनुसार, आरोपीने महिलेला प्रेमसंबंधात अडकवले त्यानंतर जबरदस्तीने महिलेचे धर्मांतर केले. यानंतर महिलेचे नाव बदलून बनावट कागदपत्रे तयार केली. याच बनावट कागदपत्रांचा वापर करून निकाह केला.
एफआयआरनुसार, राजा मियाँच्या कुटुंबाने या गुन्ह्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्याच्या आईने महिलेची मावशी असल्याचे भासवले होते, तर त्याच्या भावाने लग्नासाठी महिलेचा भाऊ असल्याची बतावणी केली होती. एका स्थानिक धर्मगुरूने बनावट निकाहनामा (विवाह करार) देखील तयार केला होता.
हे ही वाचा :
रायबरेलीत राहुल, अखिलेश आणि तेजस्वींचे ‘कलयुगचे ब्रह्मा-विष्णू-महेश’ म्हणून पोस्टर!
झारखंड येथून आयसिसचा संशयित दहशतवादी अटकेत!
नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत
ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
तक्रारीच्या आधारे, राजा मियाँ, त्याचे वडील, आई, भाऊ आणि मौलवीसह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजा मियाँ, त्याचे वडील आणि आई यांना अटक करण्यात आली असून त्याचा भाऊ आणि मौलवी अजूनही फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू आहे.







