27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामाअरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या

अरेरे! नवरा गेला, चिमुरड्यांचीही तिने केली हत्या

Google News Follow

Related

स्वतःच्या सहा व आठ वर्षाच्या दोन मुलांचा गळा दाबून आईनेच खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. कराडच्या रुक्मिणी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

सहा व आठ वर्षाच्या दोन लहान मुलांचा गळा दाबून आईनेच खून केल्याच्या घटनेने विभागात चांगलीच खळबळ उडालीय. त्यानंतर या महिलेने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. हर्ष सुजित आवटे (वय आठ) आणि आदर्श (वय सहा) अशी आईने खून केलेल्या मुलांची नावे आहेत.

अनुष्का सुजित आवटे असे आईचे नाव आहे. विषारी औषध पाजून या महिलेने नंतर मुलांचा गळा दाबून खून केलेला आहे. कराड शहरामध्ये या कुटुंबियांचे तीन मजली घर आहे. सर्वात वरच्या मजल्यावर अनुष्का आवटे आपल्या मुलांसोबत राहत होत्या. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर अनुष्का आवटे यांना एकलकोंडेपणा आला होता. त्यातूनच त्यांनी हे कृत्य केले. प्रथ्म त्यांनी हर्ष व आदर्श या दोघांनी विषारी औषध पाजले त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहिलेली याठिकाणी सापडली आहे. पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचे या चिठ्ठीमध्ये म्हटले होते. अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळेच या महिलेला त्यांच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

मच्छिमारांचा आक्रोश कुणी ऐकत आहे का?

मुंबईतील वाहनांवर चोर स्वार!

मंदिर हम खुलवायेंगे…भाजपचा नारा

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कराड शहर व परिसर हादरले असून एकच खळबळ उडाली आहे. अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा