31 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरक्राईमनामासोन्याचे दागिने देऊन महिलेचा अत्याचारातून थोडक्यात बचाव; आरोपी अटकेत

सोन्याचे दागिने देऊन महिलेचा अत्याचारातून थोडक्यात बचाव; आरोपी अटकेत

Google News Follow

Related

बोरिवली येथे सोमवारी पहाटे एका २९ वर्षीय महिलेने चातुर्याने आपले दागिने देत लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून थोडक्यात बचाव केला. ही घटना सुधीर फडके पुलाखाली घडली असून, बोरिवली आणि कांदिवली पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर मालाड पोलिसांनी आरोपी संजय राजपूत (३५) याला अटक केली आहे.

तक्रारीनुसार, दहिसर (पूर्व) येथील ही महिला १० नोव्हेंबर रोजी पहाटे जैन मंदिरात दर्शनासाठी बाहेर पडली होती. बोरिवली (पश्चिम) येथील मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ती मंडपेश्वर रोडवरील दुसऱ्या मंदिराकडे चालली असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने तिचा हात धरून तिला पुलाखालील अंधाऱ्या कोपऱ्यात ओढले. त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरडा न करता शांतपणे आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी चतुराईने त्याला तिची सोन्याची अंगठी आणि कानातले दिले. दागिने घेतल्यानंतर आरोपीने तिचा मोबाईल आणि इअरफोन हिसकावून घेत पळ काढला.

हे ही वाचा:

 

“पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल” पाक संरक्षण मंत्री असे का म्हणाले?

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज

दिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

घाबरलेल्या महिलेने लगेच जवळच्या पोलिस वाहनाकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. तिच्या सांगण्यावरून बोरिवली, कांदिवली आणि मालाड पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेव यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी राजपूतचा शोध घेऊन मंगळवारी अटक करण्यात आली. राजपूत हा दहिसरमधील प्रेम नगर परिसरातील रहिवासी असून, स्थानिक हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे आणि साफसफाईचे काम करतो. पोलिसांनी सांगितले की आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा