31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरक्राईमनामाविषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरची आत्महत्या

विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरची आत्महत्या

Google News Follow

Related

वरळी येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिला डॉक्टरने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

निताशा बेंगाली असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव असून ती एमडीचा अभ्यास करत होती. गेल्या काही महिन्यांपासून निताशा  ही मानसिक तणावाखाली असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारच्या वेळेस निताशा बेंगाली हिने तिच्या बेडरूममध्ये असताना विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले होते व त्यानंतर ती बाहेर येऊन तिच्या आईला तिने इंजेक्शन घेतल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

यशोमती ठाकूर आदित्य ठाकरेंवर का संतापल्या?

पर्यावरणमंत्री आदित्य यांचे पर्यावरण प्रेम बेगडी

खाडीतील वाढलेल्या गाळामुळे मुंबईत पुन्हा पुराचा धोका

५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही

त्यानंतर तिला तात्काळ मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिला दाखल करून घेण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या संदर्भात वरळी पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निताशा बेंगाली हिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर तिने कुठले इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले होते याचे उत्तर मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

निताशाची आईही डॉक्टर असून वडील इंजिनियर आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून निताशा ही मानसिक तणावाखाली असल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा