29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण यशोमती ठाकूर आदित्य ठाकरेंवर का संतापल्या?

यशोमती ठाकूर आदित्य ठाकरेंवर का संतापल्या?

Related

महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गोंधळात गोंधळ पाहायला मिळणे हे काही आता आपल्याला नवीन राहिले नाही. अनलॉकवर कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांच्या आधी बोलले आणि तो वाद चांगलाच रंगला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता कॉंग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विभागात हस्तक्षेप केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर यशोमती ठाकूरही संतापल्याचे कळते.

आदित्य यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून महिला व बालविकास विभागाशी संबंधित काही माहिती मागितली. तथापि सहापैकी चार आयुक्तांनी आदित्यच्या आदेशाचे पालन केले नाही. इकडे यशोमती ठाकुर यांना मात्र आदित्य ठाकरेंनी परस्पर माहिती माागितली हे त्यांना अजिबात आवडले नाही. त्यामुळे त्याही चांगल्याच संतप्त झाल्या.

हे ही वाचा:

५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही

खाडीतील वाढलेल्या गाळामुळे मुंबईत पुन्हा पुराचा धोका

ठाकरे सरकार कधीही कोसळेल ते कळणारही नाही

पालिकेच्या ट्विटर अकाऊंटसाठी कोटींची उधळण

कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार हे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री आहेत. या पदाला अनुसरून त्यांनी अनलॉकची घोषणा केली. मात्र, त्यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार या संदर्भात नवीन नियम तयार करीत आहे. कोणत्याही विभागाच्या कामात हस्तक्षेप करण्याची ताकद मुख्यमंत्र्यांकडे असते. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागात मुख्यमंत्री ठाकरे यांची राजकीय घुसखोरी कॉंग्रेसला पसंत नव्हती. आता जेव्हा आदित्य यांनीही ठाकूर यांच्या खात्यात घुसखोरी केली, तेव्हा कॉंग्रेसचे मंत्री संतापले आहेत. महिला व बालविकास विभागाने अनाथ मुलांसाठी ५ लाख रुपये व इतर मदतीची घोषणा केली आहे.

परंतु आदित्य यांनी मात्र प्रत्येक विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असून कोणत्या जिल्ह्यात किती मुले अनाथ झाली आहेत याची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. हा विभाग ठाकूर यांच्याकडे असल्याने संबंधित अधिका्यांनी आदित्यच्या आदेशाचे पालन केले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ दोन विभागीय आयुक्तांनी त्यांच्या पत्रांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या पसंतीचा लेखाजोखा न मिळाल्याबद्दल संतप्त असलेले काँग्रेसचे मंत्री आता शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपावर नाराज आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा