28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरक्राईमनामासंपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या

संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या

Related

संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या पोटात चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास गोवंडी शिवाजी नगर येथे घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या मोठ्या भावाचा कसून शोध घेण्यात येत आहे.

अस्लम कुरेशी (३५) असे हत्या करण्यात आलेल्या लहान भावाचे नाव आहे. अस्लम हा पत्नी आणि मुलासह गोवंडी येथील शिवाजी नगर , गजानन कॉलनी येथे राहण्यास होता. अक्रम कुरेशी (४०) हा मोठा भाऊ असून तो त्याच परिसरात राहण्यास होता. काही वर्षांपूर्वी आईने वडिलोपार्जित संपत्तीचे दोन हिस्से करून एक घर अक्रमला दिले आणि दुसरे घर अस्लम याला दिले होते.

हे ही वाचा:

मॉडर्ना, फायझर हृदयाला हानीकारक?

कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु

काँग्रेसमध्ये भाई जगताप विरुद्ध झिशान सिद्दिकी

मुंबई क्रिकेटचे दरवाजे अंकितसाठी उघडणार?

मात्र अक्रमने त्याला दिलेले घर विकून लहान भावाच्या घरात राहत होता. या घरामध्ये देखील मला हिस्सा पाहिजे म्हणून अक्रम हा अस्लम सोबत नेहमी वाद घालत असे. मात्र आईने मला दिलेले घर आहे, तुला देखील तुझा हिस्सा मिळाला असल्याचे अस्लमने मोठ्या भावाला अनेक वेळा सांगून देखील अक्रम हा लहान भावाच्या घराचा हिस्सा मागत होता.

सोमवारी रात्री घराच्या वाटणीवरून दोन्ही सख्या भावांमध्ये वाद झाला. या वादातून अक्रमला लहान भाऊ अस्लमने घराबाहेर काढले होते. याचा राग येऊन मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोठा भाऊ अक्रम याने घरी येऊन लहान भाऊ अस्लमच्या पोटात चाकूने भोसकून तेथून पळ काढला. अस्लमला त्याची पत्नी आणि शेजाऱ्यानी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्या तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या अक्रमचा कसून शोध घेत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा