30.3 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरक्राईमनामानेहरू नगरमध्ये लिफ्टच्या उघड्या शाफ्टमध्ये पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नेहरू नगरमध्ये लिफ्टच्या उघड्या शाफ्टमध्ये पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

निष्काळजीपणाचा संशय

Google News Follow

Related

कुर्ला पूर्व नेहरू नगर परिसरातील जागृती नगर येथे असणाऱ्या शामीम टॉवर या निवासी इमारतीत लिफ्टच्या उघड्या शाफ्टमध्ये पडून १२ वर्षीय झमीर शेख या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, इमारतीतील लिफ्टच्या देखभाल आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झमीर हा सोमवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर मित्रासोबत खेळत होता. त्यावेळी तो लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकून उभा असताना, लिफ्ट त्या मजल्यावर नसतानाही दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो थेट लिफ्टच्या शाफ्टमध्ये कोसळला. त्यावेळी लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर असल्याने झमीर लिफ्टच्या छतावर आदळला.

हे ही वाचा:

वादाच्या भोवऱ्यात एमबाप्पे; माफी मागा, नाहीतर कोर्टात या!

भारताचा चीनवर नहेले पे दहला

अफवांना सूर्यकुमारचा सणसणीत षटकार!

ओपेकचा मोठा निर्णय; तेलाचे दर कोसळण्याची चिन्हे!

मोठा आवाज ऐकून रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत झमीरला बाहेर काढले आणि तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी लिफ्टची नियमित देखभाल आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेहरू नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (एडीआर) करून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान लिफ्टची तांत्रिक स्थिती, देखभाल नोंदी आणि सुरक्षा मानकांचे पालन झाले होते का, याची पडताळणी केली जात आहे. तसेच इमारतीचे व्यवस्थापन, लिफ्ट देखभाल करणारी कंपनी किंवा संबंधित अन्य कोणाची निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शी, रहिवासी आणि सोसायटी व्यवस्थापनाची चौकशी सुरू असून, लिफ्टचा दरवाजा कशामुळे उघडला याचा नेमका तपास केला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा