23 C
Mumbai
Saturday, February 28, 2026
घरधर्म संस्कृतीपंडवानी गायिका प्रभा यादव, सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना भरतमुनी सन्मान

पंडवानी गायिका प्रभा यादव, सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना भरतमुनी सन्मान

संस्कार भारतीच्या भरतमुनि सन्मान सोहळ्याचे यावर्षी ठाण्यात आयोजन

Google News Follow

Related

संस्कार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा अखिल भारतीय भरतमुनि सन्मान सोहळा यावर्षी सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी साडेदहा वाजता हा प्रतिष्ठेचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

छत्तीसगड येथिल वेदमती शैलीतील प्रख्यात पंडवानी गायिका प्रभा यादव आणि महाराष्ट्रात पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना त्यांच्या दीर्घकालीन कला साधने साठी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल भरतमुनि सन्मान २०२५ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना, पद्मविभूषण व माजी राज्यसभा सदस्य विदुषी सोनल मानसिंग यांच्या हस्ते तसेच संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मैसूर मंजुनाथ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

साताऱ्यात ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त, पाच अटकेत

बेकायदेशीर बांगलादेशींवरील कारवाईत पोलिसांनीच चोरले सोने

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!

विजय मिरवणूक; ठाकरे गटाचे नगरसेवक मिलिंद वैद्यांसह ४० जणांवर गुन्हा

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी सांगितले की ,संस्कार भारती तर्फे दिला जाणारा अखिल भारतीय भरतमुनि सन्मान पुरस्कार भारतात पंचम वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यशास्त्र ग्रंथाचे रचनाकार महर्षी भरतमुनि यांना समर्पित आहे. कला माध्यमातून समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या असाधारण कलाकारांचा गौरव दरवर्षी केला जातो . साहित्य, मंचिय, लोककला, दृक कला, कला धरोहर या पाच विभागांपैकी दोन विभागात हा पुरस्कार दिला जातो .यावर्षी लोककला आणि चित्रकला म्हणजेच दृक विभागात हा पुरस्कार दिला जात आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि १,५१,०००/ रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

यंदाचे पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या सोहळ्याची जबाबदारी संस्कार भारती कोकण प्रांताकडे असणार आहे. कार्यक्रमावेळी लोककलेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात येणार असून हा संपूर्ण कार्यक्रम कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या पुरस्कार सोहळ्याकरिता उपस्थित राहावे तसेच संपर्क +91 98206 20148 या मोबाईल नंबर वर साधावा, असे आवाहन संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे आणि कार्याध्यक्ष मुकुंद मराठे यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा