दिंडीतील वारकऱ्यांसाठी कारुळकरांचा महाप्रसाद

कानिफनाथ दिंडीत वारकऱ्यांसाठी व्यवस्था

दिंडीतील वारकऱ्यांसाठी कारुळकरांचा महाप्रसाद

नामांकित उद्योजक आणि कारुळकर प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रशांत कारुळकर यांचे चिरंजीव विवान यांनी पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी विशेष भोजन व्यवस्थेचे आयोजन केले होते. कानिफनाथ दिंडीसाठी ही विशेष व्यवस्था कारुळकरांच्या वतीने करण्यात आली आहे.

विवान हे स्वतः लेखक, खगोल संशोधक आणि इन्फ्लुएन्सर आहेत. वारकऱ्यांनी या व्यवस्थेसाठी विवान यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.

हे ही वाचा:

नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द; पुन्हा तुरुंगात जाणार

यूपीतील अखेरच्या राजकीय माफियावर बुलडोझर फिरवण्याची तयारी

भारतीयांचा ट्रम्प, अमेरिकेवर विश्वास नाही, तर पुतिनवर विश्वास

एसटीचा प्रवास महागला! तिकीटदरात १३.५६% वाढ

कानिफनाथ दिंडीच्या वतीने या महाप्रसादासाठी कारुळकर कुटुंबियांचे आभार मानण्यात आले असून त्यांनी म्हटले आहे की, आषाढी वारीच्या या मंगलमयी सोहळ्यात, विठ्ठल नामाचा गजर करत निघालेल्या श्री कानिफनाथ दिंडीच्या विनंतीला मान देऊन, आपण आमच्या वारकऱ्यांसाठी रोजच्या एक वेळच्या महाप्रसादाची जी मोलाची व उत्तम व्यवस्था केली, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

वारीच्या कठीण प्रवासात, आपण दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि भक्तीभावाने आम्हा वारकऱ्यांची भूक भागवण्यासाठी साक्षात अन्नपूर्णेचे रूप धारण करून जे अन्नदान केले, ते आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जगद्गुरु संत तुकोबाराय अन्नदानाचा महिमा सांगताना म्हणतात: “येथे एक शित दिधल्या अन्न। होय कोटी कुळाचे उद्धरण ॥” या पवित्र संतवचनाप्रमाणे, वारीच्या मार्गावर वारकऱ्याला दिलेले अन्नाचे एक शीतही कोटी कुळांचा उद्धार करणारे ठरते. आपण केलेले हे पवित्र अन्नदान म्हणजे साक्षात विठ्ठलाचा महाप्रसाद आहे. दिंडीच्या विनंतीचा आदर ठेवून आपण जे सहकार्य केले, त्याबद्दल श्री कानिफनाथ दिंडीच्या वतीने आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो.

Exit mobile version