27 C
Mumbai
Tuesday, February 17, 2026
घरधर्म संस्कृतीकेरळ स्टोरी २ येतोय...'लव्ह जिहाद'मुळे तीन मुलींच्या उद्ध्वस्त आयुष्याची कथा!

केरळ स्टोरी २ येतोय…’लव्ह जिहाद’मुळे तीन मुलींच्या उद्ध्वस्त आयुष्याची कथा!

विपुल अमृतलाल शाह यांचे दिग्दर्शन

Google News Follow

Related

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरी  या चित्रपटाच्या यशानंतर निर्माते विपुल अमृतलाल शहा आता त्याच्या पुढील भागासह परतले आहेत. निर्मात्यांनी द केरळ स्टोरी २ गोज बियॉण्ड चा थरारक टीझर प्रसिद्ध केला असून, यात तीन हिंदू मुलींच्या आयुष्याची हृदयद्रावक कथा दाखवली आहे. या मुली त्यांच्या मुस्लिम प्रियकरांकडून विश्वासघात आणि कथित जबरदस्तीच्या धर्मांतराला सामोऱ्या जातात, असे चित्रण टिझरमध्ये दिसते. २७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टिझरमध्ये एका इशाऱ्याने सुरू होते ज्यात पुढील २५ वर्षांत भारत इस्लामी राष्ट्रात परिवर्तित होऊ शकतो आणि शरिया कायद्यांतर्गत चालवला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर कथा राजस्थानकडे वळते, जिथे एका कुटुंबाने आपल्या १६ वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने धर्मांतरास भाग पाडल्याची तक्रार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांत दाखल केली आहे.

यानंतर कथानक मध्य प्रदेशात सरकते. एका तरुण हिंदू महिलेची फसवणूक करून विवाह लावला जातो आणि नंतर तिला धर्मांतरासाठी भाग पाडले जाते, असे दाखवले आहे. तिसरी कथा पुन्हा केरळमध्ये घडते. एका मुस्लिम तरुणाने आपल्या हिंदू मैत्रिणीला विवाहपूर्व सहजीवनाचा प्रस्ताव दिल्याचे दाखवले आहे. ती धर्मांतरास नकार देते, त्यानंतर तिला कथितपणे गोमांस खाण्यास भाग पाडले जाते आणि तिच्यावर कैद्यासारखी वागणूक दिली जाते, असे दृश्य टिझरमध्ये आहे. तसेच जबरदस्तीच्या धर्मांतरानंतर इतर दोन मुलींना सहन करावी लागणारी छळवणूक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मुलींना परत आणण्यासाठीचा संघर्षही यात दाखवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘सेव्हन सिस्टर्स’बद्दल मोहम्मद युनूस यांची खुमखुमी कायम

इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो म्हणजे कल्पना आणि नवोपक्रमाचा शक्तिशाली संगम

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन तीन दिवसीय भारत दौऱ्यावर! ‘असा’ असेल कार्यक्रम

रशियाच्या मॉस्कोतील हॉस्टेलमध्ये भीषण आग

निर्मात्यांनी झलकचित्रफीत प्रसिद्ध करताना लिहिले, “यांनी आपल्या मुलींना लक्ष्य केले. त्यांचा विश्वास तोडला. त्यांचे भविष्य हिरावून घेतले. यावेळी आपण शांत बसणार नाही.” चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी “हा टिझर अंगावर काटा आणणारा आहे” अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी चित्रपटाला “प्रचारात्मक” असे संबोधले.

हा चित्रपट कामाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. यात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा यांनी तीन हिंदू मुलींची भूमिका साकारली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधांमागे नियोजित धर्मांतराचा कट असल्याचे कथानकात दाखवले गेले आहे.

चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली केली असून, सहनिर्मिती आशिन ए. शाह यांनी केली आहे. द केरळ स्टोरी २ – गोझ बियॉन्ड हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करून तो टिझर शेअर केला आहे. त्यात नितेश राणे म्हणतात की, Stop these jihadis before they enter our homes In the name of Love Jihad n make our Hindu Rashtra a Islam rashtra by 2047! The Kerala story 2 ! उठाओ दांडे .. भगाओ.. Jai shree Ram 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा