28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरधर्म संस्कृतीमराठी भाषा आता अभिजात भाषा!

मराठी भाषा आता अभिजात भाषा!

मोदी सरकारने घेतला निर्णय

Google News Follow

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली. अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या, अनेक नामांकित कवी, लेखक, साहित्यिकांनी आपल्या भाषाशैलीने अलंकृत केलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता  करत होती. या मागणीला गुरुवारी यश आले. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

यानिमित्ताने महाराष्ट्रातील जनता आनंदित असून महाराष्ट्र सरकारने जनतेचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपले सविस्तर मत व्यक्त केले आहे.

ऐतिहासिक दिवस!

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.

हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

हे ही वाचा:

वजन कमी करण्यासाठी खेळाडू इतर कोणाला दोष देऊ शकत नाहीत!

पित्याच्या नात्याला काळीमा; पोटच्या मुलीवर अत्याचार!

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण : पीडितेचा पुतळा बसवण्यावरून वाद

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा