31 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरधर्म संस्कृतीॐ गं गणपतये नमः सैषा गणेशविद्या

ॐ गं गणपतये नमः सैषा गणेशविद्या

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

‘ॐकार’ अर्थात या संपूर्ण ब्रह्मांडाचा अनाहत ध्वनी. अवघे चराचर व्यापणारा, म्हणूनच या ॐकाराचे प्रतीक असणारा तो “श्री गणेश”. या गणेशाची पूजा करण्यासाठी आत्मसाधना, ज्ञानसाधना हाच मार्ग आहे. आता पूजेसाठी काही एक श्लोक, स्तोत्र, मंत्र आवश्यक असतो. इथे ‘ॐ गं गणपतये नमः’ किंवा ‘ॐ गं गणपतये नमो नमः’ असेही उच्चारण होणारा हा एक प्रभावी व शक्तिशाली बीजमंत्र आहे. यातलं ‘गं’ हे अक्षर खरे तर या मंत्रासाठी एक ‘स्वतंत्र शब्द’ आहे आणि याचा उच्चार अनुनासिक म्हणजे नाकातून केला जातो. मराठी अक्षरमाला/वर्णमालेनुसार कोणत्याही अक्षरावरील अनुस्वाराचा नाद हा त्याच्या गटातील अनुनासिक स्वराने प्रभावित असतो. त्यानुसार अनुस्वारित ‘गं’ हे अक्षर ‘गम्’ किंवा ‘गङ्’ म्हणजे वाङ्मय शब्दातील ‘म’ ला जोडणाऱ्या अक्षरासारखे म्हटले जाते.

गणपतीची पूजा सुरू करताना अनेकांच्या सहजपणे ओठांवर येणारा मंत्र म्हणजे ‘ॐ गं गणपतये नमः’. केवळ चार शब्दांचा हा मंत्र इतका परिचित आहे की त्यामागे असलेली रचना आपण क्वचितच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण गणपती अथर्वशीर्षाचा मूळ पाठ पाहिला, तर या मंत्रातील ‘गं’ या एका अक्षराचीही स्वतंत्रपणे उकल केलेली दिसते. विशेष म्हणजे ‘ॐ गं गणपतये नमः’ या रचनेला स्वतः अथर्वशीर्षात ‘गणेशविद्या’ असे म्हटले आहे. त्यामुळे हा मंत्र केवळ प्रचलित जप नसून त्याच्या रचनेविषयी ग्रंथात नेमका संदर्भ उपलब्ध आहे.

गणपती अथर्वशीर्षात ‘गं’ या मंत्रस्वरूपाची रचना सांगताना असं म्हटलं आहे:

गकारः पूर्वरूपम्। अकारो मध्यरूपम्। अनुस्वारश्चान्त्यरूपम्। बिन्दुरुत्तररूपम्। नादः सन्धानम्। संहिता सन्धिः॥

म्हणजे या रचनेत गकार हे पूर्वरूप, अकार हे मध्यरूप आणि अनुस्वार हे अंतिम स्वरूप सांगितलं आहे. पुढे बिंदु आणि नाद यांचाही उल्लेख केला आहे. या सर्व विवेचनानंतर ग्रंथात एक महत्त्वाची ओळ येते:

सैषा गणेशविद्या।

अर्थात हीच गणेशविद्या आहे. यामुळे ‘गं’ हे अक्षर मंत्रात किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. ग्रंथ त्याकडे केवळ एका साध्या उच्चाराप्रमाणे पाहत नाही, तर त्याची विशिष्ट मंत्ररचना स्पष्ट करतो. ‘गं’ चा अर्थ एखाद्या सामान्य संस्कृत शब्दासारखा एका शब्दात सांगता येत नाही, कारण येथे त्याच्या शब्दार्थापेक्षा मंत्ररचनेच्या दृष्टीने वेगळा विचार केला आहे. गकार, अकार, अनुस्वार, बिंदु आणि नाद यांच्या माध्यमातून ‘गं’ चे स्वरूप स्पष्ट केलं जातं. त्यामुळे ‘गं’ ला गणपतीच्या उपासनेतील बीजाक्षर म्हणून ओळखलं जातं. मात्र याचा अर्थ असा घेणं योग्य नाही की ‘गं’ चा एखादा स्वतंत्र शब्दशः अर्थ म्हणजे गणपती. अथर्वशीर्षात त्याची मांडणी मंत्ररचनेच्या स्वरूपातच केली आहे.

मंत्रातील प्रत्येक भागाकडे पाहिल्यास त्याची रचना अधिक स्पष्ट होते: ॐ – प्रणव किंवा ॐकार, गं – गणपतीच्या मंत्रपरंपरेतील बीजाक्षर. अथर्वशीर्षात हीच रचना स्वतंत्रपणे सांगितली आहे, गणपतये – गणपतीला, नमः – नमस्कार किंवा नमन. त्यामुळे या मंत्राचा साधा भावार्थ ‘गणपतीला नमन’ असा होतो. मात्र या साध्या अर्थाच्या मागे ‘गं’ च्या रचनेचं स्वतंत्र विवेचन असल्यामुळे मंत्राचा संदर्भ अधिक खोल जातो. या मंत्रजपामुळे बाधानिवारण, यश, सफलता, मानसिक शांतता, एकाग्रता, विवेकबुद्धीचा विकास असे आध्यात्मिक, मानसिक लाभ मिळतात. आसपास सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो, असं सांगितलं जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा