26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरधर्म संस्कृतीसंघ स्वयंसेवक तयार करतो, दबाव गट नाही

संघ स्वयंसेवक तयार करतो, दबाव गट नाही

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देशातील विविध क्षेत्रात काम करून राष्ट्र उभारणीत योगदान देतात, ते दबावगट म्हणून काम करत नाहीत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले आहे. पणजीमध्ये एका सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पदाधिकारी आणि संलग्न संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले. संघप्रमुख म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहीत नसलेले लोक त्याबद्दल वाईट प्रचार करतात. लोकांनी संघाच्या जवळ यावे ,त्याचे कार्य पहावे आणि मग त्यात सामील व्हावे . संघामध्ये प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे. ते सोबत येऊन मोठी भूमिका बजावू शकतात असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

भागवत मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की , संघाशी संबंधित लोक खूप सामाजिक कार्य करतात आणि त्यांना मदत करतात, पण ती सेवा संस्था आहे असे मानू नये. कधीकधी स्वयंसेवक एखाद्याला वैयक्तिकरित्या मदत देखील करतात. संघात लोककल्याणासाठी अनेक उपक्रम शिकवले जात असल्याने स्वयंसेवक त्या क्षमतेचा लाभ वैयक्तिकरित्या इतर लोकांनाही देतात. मात्र याकडे संघाचा दबाव म्हणून पाहिले जाऊ नये. , संघाला संपूर्ण देश एकसंध ठेवायचा आहे आणि तो मजबूत बनवायचा आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा:

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

आता आधार संजयबाबा बंगालींचा…

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी

 

संघ दुरून ओळखता येत नाही
सरसंघचालक म्हणाले, ‘संघ दुरून ओळखता येत नाही, संघ जवळ आल्यानेच समजू शकतो.’ ते म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे स्वयंसेवक तयार करतो, जे अनेक क्षेत्रात देशासाठी योगदान देतात. पण संघाला आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून कोणावरही दबाव आणायचा नाही. संघाचे स्वयंसेवक वैयक्तिक पातळीवर विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात, पण याचा अर्थ संघ ही सेवा संस्था आहे असे नाही. संघाने स्वयंसेवकांना कल्पना दिल्या आहेत, त्यामुळे ते जिथे कामाची गरज आहे तिथे काम करतात.

स्वार्थी कृत्य करणाऱ्यांना स्थान नाही
संघात सर्वांना सामावून घेण्याची आणि सोबत घेण्याची क्षमता आहे. स्वार्थी कृत्य करणाऱ्यांना तिथे स्थान नाही. पण ज्या व्यक्तीला देशाच्या हिताची जाणीव आहे, तो संघात सहभागी होऊन योगदान देऊ शकतो. भागवत यांनी दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांचा समावेश करण्याचे आवाहन भागवत यांनी यावेळी केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा