27.5 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरराजकारणसंजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

नारायण राणे यांचे संजय राऊत यांना आवाहन

Google News Follow

Related

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे. आज मी माझे संरक्षण सोडायला तयार आहे असा खणखणीत इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला आहे. राऊत यांनी नारायण राणे यांना एकट्याने फिरण्याचे आव्हान दिले होते. राणे यांच्या सुरक्षेबद्दल देखील राऊत यांनी आरोप केले होते. त्याला राणे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

कुणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. १९९० सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणू मला ९० सालापासून मला संरक्षण दिलं आहे. पोलिसांनी मला जबरदस्तीने मला संरक्षण दिलं आहे हे राऊतांना हे माहीत नाही. कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभेत लेख लिहित होते. तुम्हाला आज सांगतो. संजय राऊत तू जिथं म्हणशील तिथे येतो. आजच संरक्षण सोडतो. बघुया, असे खुले आवाहने राणे यांनी राऊत यांना दिले.

भाजपचे आमदार राम कदम यांनी काशी आणि सारनाथचं दर्शन घडवण्यासाठी मोफत गाडी सोडण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा कंदील दिला. राऊत यांनी राणे यांच्याबद्दल केलेल्या आरोपांबद्दल माध्यमांनी राणे यांना विचारणा केली. त्यावेळी संतापून राणे यांनी एक ना एक दिवस मी राऊत समोर संरक्षण सोडून जाईल. मी एकटाच जाईन. मला काही फरक पडत नाही. माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. शिवसेना संपवण्याचा नाहीये. माझ्या वाटेला येऊ नको असा थेट इशाराच राऊत याना दिला.

हे ही वाचा:

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

आताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर
जनतेला सुखी समाधानी करण्यासाठी आमच सरकार राज्यात काम करत आहे. हे काय लोकांच्या हिताच बोलतात. सकाळी उठल्यापासून याला एकच काम टीका फक्त टीका. अडीच वर्षात त्यांनी राज्याचा काय विकास केला. राज्याचा किती जीडीपी वाढवला, किती रोजगार उपलब्ध करुन दिला हे सांगावे. आताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर आहे. लेखातून शिव्या देण्यापलिकडे काही काम तो करत नाही अशी टीकाही राणे यांनी यावेळी केली .

एक दिवस उद्धव ठाकरे यांना भेटणार
एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी खासदार असताना संसदेत संजय राऊत माझ्या बाजूला बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय काय बोलायचा ते मी त्यांना सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून उद्धव आणि रश्मी ठाकरे संजय राऊतला चपलेने मारले नाहीतर मला सांगा असे म्हणत राणे यांनी संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची तिखट टीका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा