29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरधर्म संस्कृतीआदि शंकराचार्यांचे श्री चिंतामणी षट्पदी

आदि शंकराचार्यांचे श्री चिंतामणी षट्पदी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

‘श्री चिंतामणी षट्पदी’ हे आदिशंकाराचार्यांनी भगवान गणेशाच्या चिंतामणी रूपाची स्तुती करण्यासाठी समर्पित असणारे अत्यंत पूजनीय, पवित्र स्तोत्र वा भक्तिगीत रचले आहे. चिंतामणी अर्थात असे एक मौक्तिक किंवा अद्भुत रत्न ज्याच्याशी इच्छा पूर्ण करण्याची/होण्याची कल्पना येऊन थांबते. मात्र गणेशाला ‘चिंतामणी’ संबोधताना या शब्दाला अधिक सूक्ष्म अर्थ प्राप्त होतो. त्यानुसार, जो भक्त गणेशाचे चिंतन करतो, त्याच्या सर्व चिंतांचे हरण करणारा ‘गणराय’ हा त्याच्यासाठी चिंतामणीच ठरतो, अशी सुंदर कल्पना या चिंतामणी षट्पदीमध्ये मांडली आहे. म्हणजेच हे स्तोत्र केवळ गणेशरूपाचे वर्णन नसून भक्त आणि उपास्य यांच्यातील नाते उलगडणारी रचना ठरते.

या स्तोत्राच्या सहाव्या श्लोकात गणेशाला “चिंतकचिंतामणे” असे संबोधले आहे. चिंतक म्हणजे चिंतन करणारा आणि चिंतामणी म्हणजे त्याच्या चिंतनाचा आधार. म्हणजेच भक्त ज्या गणेशाचे चिंतन करतो, त्याच गणेशामध्ये त्याला आश्रय आणि समाधान मिळते, अशी या शब्दातून व्यक्त होणारी कल्पना आहे.

‘षट्पदी’ हे नावही तितकंच वैशिष्ट्यपूर्ण. याचा अर्थच मुळी ‘सहा पद’—इथे पाय किंवा पदे/श्लोक असा आहे. संस्कृतमध्ये षट्पदी म्हणजे सहा पायांची. याच शब्दाचा अर्थ भुंगा किंवा मधमाशी असाही होतो. इथे मानवी मनाची तुलना भ्रमराशी करताना, हा जसा सतत इकडे-तिकडे फिरतो, तसेच आपले मनही चंचल असते. या स्तोत्राने मनाला शांतता, एकाग्रता लाभते, असे म्हणतात.

स्तोत्रात सहा मुख्य श्लोक आहेत, तर सातवा श्लोक सांगता करणारा आहे. शेवटी या षट्पदीने गणपतीच्या चरणकमलात विसावावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सहा श्लोकांची स्तुती आणि सहा पायांचा भुंगा यांची सांगड घालत गणपतीच्या चरणकमळाची सुंदर काव्यप्रतिमा उभी राहते.

पहिल्या श्लोकात गणेशाला ‘द्विरदवदन’ (म्हणजे हत्तीमुखी) आणि ‘विषमरद’ (म्हणजे एकदंत) संबोधून अंतराय दूर करण्याची प्रार्थना केली आहे. दुसऱ्या श्लोकात मस्तकावरील चंद्रकोर, कपोल आणि तेजाचे वर्णन करत गणेशाला संपूर्ण प्रपंचाचा आधार मानले आहे. तिसऱ्या श्लोकात परशू, पाश आणि मूषक वाहनाचा उल्लेख येतो. चौथ्या श्लोकात ‘लंबोदर’, ‘दुर्वासन’ आणि ‘मोदकाशनक’ अशी रूपे येतात. त्यातील ‘शनकैः’ म्हणजे हळूहळू किंवा सावकाश या शब्दातून गणेशाने आपल्याकडे शांतपणे कृपादृष्टीने पाहावे, अशी भक्ताची विनंती व्यक्त होते. पाचव्या श्लोकात देवतांनी वंदन केलेल्या गणेशाचे वर्णन येते. सहाव्या श्लोकात स्तोत्राची भावनिक दिशा अधिक स्पष्ट होते. ‘चिंतकचिंतामणे’ आणि ‘करुणावरुणालय’ अशा संबोधनातून भक्त गणेशाच्या चरणी आश्रय आणि करुणेची याचना करतो. अशा प्रकारे विघ्न दूर करणारा गणेश, विश्वाचा आधार, करुणेचा समुद्र आणि चिंतन करणाऱ्याचा चिंतामणी, ही विविध रूपे अवघ्या सहा श्लोकात एकत्र येतात. शेवटी ही स्तुती भुंग्याप्रमाणे गणपतीच्या चरणकमलात विसावते. या षट्पदीच्या पठणाने चिंतेपासून मुक्ती म्हणजे मानसिक ताण, नैराश्य दूर होते. राहु-केतु-शनीच्या दोषांमुळे येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा