25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरधर्म संस्कृती'आय लव्ह मुहम्मद'मागे आस्था कमी, षड्यंत्र जास्त

‘आय लव्ह मुहम्मद’मागे आस्था कमी, षड्यंत्र जास्त

Google News Follow

Related

आय लव्ह मोहम्मद” हे एका धार्मिक मिरवणुकीत झळकलेले एक बॅनर होते. वरकरणी पाहता एखाद्या धार्मिक माणसाने त्याच्या धर्माच्या प्रेषिताबाबत आस्था, विश्वास आणि प्रेम व्यक्त करणारे हे वाक्य वाटते पण त्याभोवती उभं राहिलेलं वादळ आता उत्तरप्रदेश राज्याच्या सीमा ओलांडून गेलं आहे. कानपूरमध्ये लागलेली ठिणगी बघता बघता देशभरात पोहोचली मग काय रस्त्यांवर घोषणाबाजी, मोर्चे, दंगली सुरु झाल्या. एका साध्या घोषणेमुळे एवढे मोठे राजकीय-धार्मिक वादळ का उसळलं? या मागे सुनियोजित षडयंत्र असावे असा संशय घेण्यास सबळ कारणे नक्कीच आहेत. एकंदर सर्व घटनाक्रम पाहता “आय लव्ह मोहम्मद” ही अराजकाच्या उपासकांनी शोधून काढलेली नवी बांग असावी अशी शंका उत्पन्न होते.
झाले असे की..
कानपूरमध्ये मुस्लीम समाजातील एका पंथाने आयोजित केलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत ‘आय लव्ह मोहम्मद’ अशी घोषणा लिहिलेले बॅनर हातात घेऊन लोक सामील झाले. ही घटना वाटते तेवढी साधी सरळ नक्कीच नव्हती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मिरवणुकीच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उभारलेला शामियाना हा परंपरागत ठरलेल्या आणि नियमित केलेल्या जागेएवजी दुसर्‍याच जागी उभारला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. मात्र समाजविघातक शक्तींनी धार्मिक मुसलमानांना त्यांच्या धार्मिक उत्सवापासून रोखले जात आहे, मुसलमानांना सरकार दुय्यम वागणूक देते असे आरोप करून या प्रकरणाला वेगळे वळण दिले.गेले दशकभर भारताबाहेरील अराजकवादी शक्तींच्या पाठींब्याने भारतातील अनेक संस्था, संघटना वेगवेगळ्या कारणांनी लोकांना चिथावणे, दंगली करण्यास उद्युक्त करणे या अजेंड्यावर काम करत आहेत. पिढ्यानपिढ्या सत्तेची मलई ओरपून देखील हपापलेल्या आणि लोकांनी सत्तेतून हाकललेल्या राजकीय पक्षांकडून देखील या राष्ट्रद्रोही प्रयत्नांना साथ मिळत आहे. परिणामी धार्मिक, जातीय, भाषीय मुद्द्यांवरून वाद निर्माण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न विशेषतः भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये वारंवार होताना दिसतात. त्यामुळेच कानपूरमध्ये घडलेल्या या घटनेचे देशात ठिकठिकाणी पडसाद उमटले.

हे ही वाचा:

“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?

उज्ज्वला योजनेने दिला महिलांना दिलासा

सोनम वांगचुक अटक प्रकरणात दिलासा नाही; सुनावणी पुढे ढकलली!

भारताला त्यांच्याच युद्ध विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकू!

हिंदू आणि मुस्लिम जीवनपद्धतीत तफावत आहे. पाकिस्ताननिर्मितीनंतरही मुस्लीम भारतात राहिले. पारसी समुदायासारखे ते दुधातली साखर झाले नाहीत. उलटपक्षी तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाने सातत्याने मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्याचे आणि हिंदूंना लक्ष्य करून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक ओळख पुसून टाकण्याचे धोरण स्वीकारल्याने त्यांची मुजोरी वाढतच गेली. जेव्हा या मुजोरीला वैतागलेल्या बहुसंख्यांक हिंदूंनी हिंदू संघटनांना साथ देण्यास सुरूवात केली. तरीही ते आपले अस्तित्व चांगलेच टिकवून राहिले. तसेही नाईलाज म्हणा किंवा तणाव वाढला आणि त्याचा फायदा धर्मांध जिहाद्यांनी आणि सत्तालोलुप स्यूडो सेक्युलर राजकीय पक्षांनी घेतला.

ताज्या कानपुर प्रकरणात नेमके हेच घडले. शायर मुन्नवर राणाची मुलगी सुमैया राणा, लखनौमधील विधानसभेवर काही महिला-बालकांना घेऊन गेली. त्यांच्या हातात ‘आय लव मोहम्मद’ लिहिलेले बॅनर होते. विधानसभेत असे कुणीही जाऊ शकत नाही. म्हणून पोलिसांनी त्यांना अडवले. तर सुमैया हिने पालुपद सुरू केले की, प्रशासन आणि सरकारही मुस्लिमांच्या ‘आय लव मोहम्मद’ म्हणण्याला विरोध करत आहेत.

मुस्लिम मतांच्या सौदेबाजीचे राजकारण करणाऱ्या मुस्लिम इत्तेहादून मजलिसचे ओवैसी बंधूनी या ठिणगीवर पेट्रोल ओतून आग भडकावली. “आय लव मोहम्मद, कानपूर पोलीस ये जुर्म नहीं, और जुर्म हैं तो इसकी हर सजा मंजूर हैं|” असे संविधान विरोधी वक्तव्य करून असदुद्दीन ओवैसी मोकळे झाले. यानंतर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आय लव्ह मोहमद घोषणा पद्धतशीरपणे पोहोचवली गेली. यासाठी ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर आणि स्टिकर्स लावण्यात आले. काही ठिकाणी तर कानपूरच्या धर्तीवर मिरवणूकाही काढण्यात आल्या. वस्तुतः हा सर्व उपद्व्याप सुरु होता हिंदूंना भडकावून आणि मुस्लिमांना चिथावून दंगली घडवून आणण्यासाठी. परंतु हिंदूंनी समजूतदारपणा दाखवल्याने शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहिली.

अहिल्यानगरात दंगल

महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर “आय लव्ह मोहम्मद” असे लिहिलेली रांगोळी काढल्याचे कारण होऊन दोन गटांत तणाव निर्माण झाला. अराजकवादी शक्ती आणि धर्मांध जिहाद्यांनी या घटनेला हिंसक वळण दिले. रस्त्यावर रांगोळी काढणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतल्याने जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी तातडीने केलेल्या कडक उपाययोजनेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणाव निवळायला मात्र बराच वेळ लागला. आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करणाऱ्या ३०-३५ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

तृणमूलचे कडून धर्मांधांचे लांगुनचालन

प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे मुस्लीम लांगूलचालनाचे राजकारण रोज नवनवे आविष्कार दाखवत आहेत. यंदा कोलकात्यातील एका दुर्गापूजा मंडपात दुर्गेच्या स्तोत्राऐवजी ‌‘काबा इन माय हार्ट‌’ हे गाणे गायले गेले. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी दुर्गापूजा मंडपात उपस्थित होत्या आणि त्या टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होत्या.

काबा आणि दुर्गापूजा यांचा दुरन्वयानेही काही संबंध नसताना हिंदूंच्या सणांचा आणि देवतांचा अपमान करणे हेच तृणमूल काँग्रेसचे धोरण आहे. दोन वर्षांपूर्वी ईदमुळे दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जनही लांबविण्यात आले होते. आता तर दुर्गेपुढे चक्क मुस्लीम काब्याची आरती गायली गेली आहे. आपल्या अनागोंदी कारभारामुळे राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमुळे संत्रस्त लोक आपल्याला पुन्हा निवडून देणे अवघड आहे हे लक्षात आल्यामुळे ममता बॅनर्जीनी मुस्लिमांचे तुष्टीकरण करून त्यांची मतपेढी आपल्या बाजूने वाळवून घेण्याचे निकराचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. त्यामुळे कट्टरवादी मुस्लिमांची भीड चेपली जात आहे.

देशात अराजक निर्माण करण्याची विरोधकांची इच्छा, आता लपून राहिलेली नाही. बांगलादेश, नेपाळ वगैरे देशांमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या उठावांमुळे तेथे सत्तापालट झाला. रीतसर निवडणुकीत मोदी यांना हरविणे अशक्य असल्याची खात्री विरोधकांना पटली असल्याने, आता भारतातही बेकायदेशीर मार्गाने सत्तांतर घडवून आणण्याचा विरोधी पक्षांचा मनसुबा आहे. त्यासाठीच देशात अराजक माजावे, तरुणांनी आंदोलनाच्या रूपाने रस्त्यांवर यावे आणि दंगल माजवून मोदी सरकार उलथवून टाकावे, हीच विरोधी पक्षांची मनापासूनची इच्छा आहे. ते अर्थातच दिवास्वप्न आहे.

मुस्लीम समाजगटांकडून छोट्या-मोठ्या प्रमाणात दंगली घडवून, देशात सरकार विरोधात असंतोष माजवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. ‌‘आय लव्ह मोहम्मद‌’वरून होणारा संघर्ष हा त्याचाच एक भाग. या दंगली प्रामुख्याने भाजपशासित राज्यांमध्येच घडल्या आहेत, ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. कसेही करून देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, त्यावर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कठोर कारवाई केल्यास व्हिक्टिम कार्ड खेळून त्यांच्या सरकारला बदनाम करायचे आणि कट्टरपंथीयांना चिथावणी देऊन उकसवायचे हाच देशविरोधी शक्तींचा डाव आहे.

बऱ्याच वेळा दंगली उसळण्यामागची तात्कालिक कारणे अगदीच किरकोळ असतात. धर्मांध नेते तेवढाच धागा पकडून आधीपासूनच धुमसणारी माथी भडकविण्याचे काम करतात. जाकीर नाईक सारखा जिहादी नेता मलेशियात बसून भारतात रक्तपात घडवितो, तर कधी युरोपीय देशांत घडलेल्या क्षुल्लक घटनांचे पडसाद आपल्या देशात उमटतात.

या धर्मांध, जिहादी दहशतवादी, मुजोर मानसिकतेचा बिमोड करणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी अशा कट्टरवादी मानसिकतेचा वापर दंगली घडवण्यासाठी करणाऱ्या अराजकवादी शक्तींच्या विरोधात कडक कायदे करून कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा