वैद्यकशास्त्रातील २०२५ सालच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने सोमवारी नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. या वर्षी मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. तिघांनाही परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलतेशी (peripheral immune tolerance) संबंधित शोधांसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला स्वतःच्या अवयवांवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी ती कशी नियंत्रित ठेवली जाते हे स्पष्ट करणाऱ्या शोधांसाठी मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना २०२५ चा शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
मेरी ई. ब्रुंको (जन्म १९६१) यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आणि सध्या त्या सिएटलमधील इन्स्टिट्यूट फॉर सिस्टम्स बायोलॉजी येथे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून काम करतात. फ्रेड रॅम्सडेल (जन्म १९६०) यांनी १९८७ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस येथून पीएच.डी. मिळवली आणि आता ते सॅन फ्रान्सिस्को येथील सोनोमा बायोथेरप्यूटिक्स येथे वैज्ञानिक सल्लागार आहेत. शिमोन साकागुची (जन्म १९५१) यांनी १९७६ मध्ये जपानमधील क्योटो विद्यापीठातून एमडी आणि १९८३ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आणि ते ओसाका विद्यापीठातील इम्यूनोलॉजी फ्रंटियर रिसर्च सेंटरमध्ये प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.
BREAKING NEWS
The 2025 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Mary E. Brunkow, Fred Ramsdell and Shimon Sakaguchi “for their discoveries concerning peripheral immune tolerance.” pic.twitter.com/nhjxJSoZEr— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2025
परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेवरील त्यांच्या कार्यातून हे उघड झाले की टी पेशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यारोगप्रतिकार पेशींचा एक विशेष वर्ग रोगांविरुद्ध संरक्षक म्हणून कसा काम करतो. दररोज, रोगप्रतिकारक शक्ती हजारो आक्रमक सूक्ष्मजीवांपासून आपले रक्षण करत असते. परंतु अनेक रोगांच्या पेशी या आपला शोध टाळण्यासाठी मानवी पेशींची नक्कल करतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला परकीय धोके आणि शरीराच्या स्वतःच्या पेशींमधील फरक समाजाने अत्यंत महत्त्वाचे बनते. या पुरस्कार विजेत्यांच्या कार्याने परिधीय सहनशीलतेमागील यंत्रणा, रोगप्रतिकारक शक्तीची स्वतःला हानी पोहोचवू नये अशी क्षमता उघड करून या क्षेत्रात बहुमूल्य असे योगदान दिले आहे.
हेही वाचा :
“नेहमी नकारात्मक का असता?” ट्रम्प यांचा नेतन्याहू यांना प्रश्न; नेमकं काय घडलं?
बंगालमधील पूरग्रस्तांना भेट देत असताना भाजपा खासदारावर हल्ला!
‘न्यू बॉल स्टार’ क्रांती गोड — पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास!
Women Worldcup 2025: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर हरमनप्रीत म्हणाली – खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा मंगळवारी, रसायनशास्त्रातील बुधवारी आणि साहित्यातील नोबेल विजेत्यांची घोषणा गुरुवारी केली जाईल. शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी होईल.







