मालवणीतील काँग्रेस नेते स्लम शेख यांच्या पुढाकाराने मोकळ्या जागांवर झोपड्या ठोकून बांगलादेशी उद्धाराचा जो कार्यक्रम रेटण्यात येत होता. त्यावर पहिला कुठाराघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे कुदळवाडी पार्ट-२ राबवायचे मनावर घेतलेले दिसते. गेले दोन दिवस साईकृपानगर येथे तोडकाम सुरू आहे. उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांना हे श्रेय द्यायला हवे. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी असलेले उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी याप्रकरणी घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरलेली आहे.
मालवणीतील मोकळ्या जागांवर गेली अनेक वर्षे वसवण्यात येणाऱ्या बांगलादेशांच्या वस्त्यांबाबत न्यूज डंका सातत्याने आवाज उठवण्याचे काम करतो आहे. ही समस्या गंभीर आहे. मुंबईच्या लोकसंख्येचे गणित बिघडवण्याचे हे षडयंत्र आहे. देशाशी देणेघेणे नसलेल्या उपऱ्या बांगलादेशींच्या वस्त्या निर्माण करण्याचीही घातक मोहीम गेली अनेक वर्षे अत्यंत शांतपणे राबवली जाते आहे. एका बाजूला मालवणीतून हिंदू हुसकावून लावला जात असताना बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या सतत वाढेल याची काळजी काँग्रेसचे स्थानिक नेते घेतायत.
२७ ऑक्टोबर रोजी आम्ही ‘अस्लम कृपेने मुंबईत वसवला जातोय ढाका’ हा व्हीडीयोच्या माध्यमातून मालवणीतून होणारे हिंदूंचे पलायन, साईकृपानगर, धारीवली, अंबोजवाडी अशा अनेक बांगलादेशी वस्त्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले होते. बांगलादेशींच्या वस्त्या या विषयावर सविस्तर तपशील दिला. भ्रष्ट पालिका अधिकारी आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवली. आमच्या या आवाजाची दखल घेऊन गेले दोन दिवस गावदेवी येथील भूखंड क्रमांक २६७० वर बसवण्यात येणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर बुलडोजर फिरवला जात आहे. साडेतीन एकरांचा हा भूखंड मोकळा करण्याची कारवाई सुरू झालेली आहे. सुलनात मिया सरकार, हारुन मिया सरदार, रुबीना बाबू मिया सरदार यांनी ही झोपडपट्टी वसवली. इथे बांगलादेशींचा सुळसुळाट तर आहेच. शिवाय इथे चरस गांजाचा धंदाही जोरात आले. अली तलाव आणि चिकूवाडी येथील अनधिकृत बांधकामांवर रविवार सकाळपासून बुलडोजर फिरू लागले. २०० च्या वर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. अवघ्या २५ वर्षांपूर्वी हिंदू बहुल असलेल्या या परीसरात अली तलाव निर्माण झाला, यावरून इथे काय परिस्थिती असेल याची कल्पना करा. इथे अली नावाने वस्त्या कोणी निर्माण केल्या याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
एका आमदाराने निर्माण केलेले हे झोपड्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त करणे सोपे नाही. रविवारपासून सुरू झालेली कारवाई मालवणी बांगलादेशी मुक्त होईपर्यंत सुरू ठेवणे गरजेचे आहे. इथे फक्त झोपड्या नाहीत, बांगलादेशींसाठी छोटे मोठे कारखाने, गॅरेज सुद्धा थाटण्यात आलेली आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. त्यांनी मालवणीत सतत दौरे केले. जनता दरबारात होणाऱ्या सुनावणीत लोकांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्याचे सहपालक मंत्री म्हणून निराकरण करण्याचा प्रय़त्न केला. झोपडयांच्या अतिक्रमणावर व्यक्तिगत लक्ष दिले. सरकार तुम्हारी सिस्टीम हमारी… हे खपवून घेतले जाणार नाही, हे संबंधितांना खडसावून सांगितले. सहपालक मंत्री म्हणून हा विषय मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या कानापर्यंत नेला. या पाठपुराव्याला दाद द्यायलाच हवी, त्यांचे अभिनंदन करायलाच हवे.
हे ही वाचा:
आसाम रायफल्सने उद्ध्वस्त केली अफूची शेती
भारताची मोठी तांत्रिक झेप ठरली ऐतिहासिक
राज्यात रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द
बांगलादेश बनला नवा ‘नार्को हब’
केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांच्या मतदार संघात मालवणी हा भाग येतो. रविवारी बोरीवलीतील पालिका कार्यालयात त्यांनी पालिका, पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मालवणीतील अनधिकृत झोपड्या हटवल्याच पाहिजेत अशी ठाम भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीत ही कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई सुरू झाली. एका बाजूला वाणिज्य मंत्री म्हणून चोख कारवाई करताना पियूष गोयल यांनी उत्तर मुंबईतील महत्वाची समस्या सोडवण्याच्या दिशेने लक्ष दिले ही बाब नजरेआड करता येणार नाही.
मंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या अनधिकृत झोपड्यांकडे महायुती सरकारचे लक्ष गेले आणि भाजपाचे बिनीचे नेते या कारवाईचा पाठपुरावा करतायत ही बाब महत्वाची आहे. परंतु इथे सातत्य हवे. संपूर्ण मालवणी बांगलादेशी मुक्त करण्याचा संकल्प सोडून ही कारवाई व्हायला हवी. या झोपड्या वसवून सरकारी भूखंडांचा कब्जा करणाऱे माफीया, त्यांना संरक्षण देणारे स्लम खान, पालिकेचे अधिकारी, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. दोषींची रवानगी तुरुंगात केली पाहिजे. मुंबईचे मराठीपण जपण्याचा हाच राजमार्ग आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, पियूष गोयल आणि या विषयासाठी सुरूवातीपासून लढणारे स्थानिक भाजपा नेते ब्रिजेश सिंह यांचे मनापासून अभिनंदन.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







