26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरसंपादकीयखानावळीने माती खाल्ली; एक मर्दानी कडाडली

खानावळीने माती खाल्ली; एक मर्दानी कडाडली

Google News Follow

Related

विदेशी एनजीओंकडून पैसा घेऊन गाझासाठी अश्रू ढाळणाऱ्या, ‘ऑल आईज ऑन गाझा’ नावाचा तमाशा करणाऱ्या उर्दूबुड अर्थात बॉलिवूडच्या षंढांना जान्हवी कपूर नावाच्या मर्दानीने सणसणीत आवाज दिला आहे. तिने बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या पाशवी जनावरांचा निषेध केला आहे. तिने गाझावर अश्रू ढाळणाऱ्या आणि दिपू चंद्र दासच्या हत्येवर गप्प राहणाऱ्या सेलिब्रेटींना नागडे केले आहे. कित्येक स्टार, स्टार किड्स, सुपरस्टारचा गोतावळा असलेल्या उर्दूवुडमध्ये दिपू चंद्र दासच्या हत्येबाबत बोलणाऱ्या फक्त तीन तारका निघाल्या. जान्हवी कपूर आणि रवीना टंडनसोबत ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा.

२०१५ मध्ये उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस बाळगल्याच्या संशयावर मोहम्मद अखलाकची हत्या झाली होती. या हत्येनंतर काँग्रेस पक्ष, त्यांची डावी इकोसिस्टीम कामाला लागली होती. जगातील सगळा हिंसाचार हिंदू समाज करतोय असा आव आणून ट्वीटचा सपाटा लावला होता. करीना कपूर, शाहरुख खान, आमीर खान, सैफ अली, सलमान खान, नासिरुद्दीस शाह, फरहान अख्तर, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, हृतिक रोशन, जावेद अख्तर, गुलजार, हे सगळे पेटले होते. रवीश कुमार, अरफा खान शेरवानी, ध्रुव राठी, मोहमद जुबेर, ही पत्रकारांची गॅंगही होती.

बांगलादेशात दिपू चंद्र दासला फॅक्टरीतून फरफटत आणले तुडवून तुडवून मारले. परंतु यापैकी एकाच्याही आत्म्याला क्लेष झाला नाही. ही तीच गॅंग आहे, ज्यांना गाझाबाबत प्रचंड कळवळा असतो. पॅलेस्टाईनच्या नावाने हे कायम उर बडवत असतात. तिथे होत असलेल्या अन्यायाबाबत सतत बोलत असतात. कारण या उर्दूवुडचा डीएनए पाकिस्तानी आहे. गेली अनेक दशके पाकिस्तान भारताला रक्तबंबाळ करत असताना, काश्मीर पेटवत असताना उर्दूवुडचे पाकिस्तानसाठीचे उमाळे काही कमी झाले नाहीत.

या गँगच्या म्होरक्यांपैकी एक दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे सगळे सिनेमे पाहा. इथे पाकिस्तानी हेर सुद्धा भारतीय हेराच्या हातात हात आणि गळ्यात गळे घालून गाणी म्हणत असतो. करण जोहरचा दोस्त शाहरुख खानच्या पठाण या सिनेमातला खलनायक हा भारतीय गुप्तचर यंत्रणेचा गद्दार एजण्ट दाखवला आहे. थोडक्यात पाकिस्तान प्रेमाचा कधीही न आटणारा झरा या लोकांच्या मनात वाहत असतो. जान्हवी कपूर हीने या तमाशावरच कठोर प्रहार केले आहेत.

जान्हवीने इन्स्टाग्रामवर केलेल्या ट्वीटमध्ये संतापाची आग आहे, सत्याची धार आहे. जळजळीत सवाल आहेत. ती म्हणते, ‘बांगलादेशात जे घडते आहे, ते रानटी अमानवी आहे. तुम्हाला जर या अमानवी हत्येबाबत माहीत नसेल तर वाचा, पाहा, प्रश्न विचारा. हे घडत असताना तुम्हाला जर संताप आला नाही, तर हा निव्वळ दांभिकपणा ठरेल, जो आपल्याला उद्ध्वस्त केल्या शिवाय राहणार नाही. आपल्या बंधू-भगिनींना जिवंत जाळले जात असताना आपण जगात घडणाऱ्या घडामोडींवर छाती पिटत राहू. कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचा निषेध व्हायला.’

जान्हवी फक्त व्यक्त झालेली नाही. तिने डरकाळी फोडलेली आहे. तिने उर्दूवुड मधल्या मुखंडांना जाब विचारला आहे. खानावळीला आव्हान दिले आहे. त्यांची कॉलर पकडली आहे. हिंदू जगभरात कुठेही असो तो आपला बंधू आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

जान्हवी ही फार मोठी अभिनेत्री नाही. ती कडवट हिंदुत्ववादी वगैरेही नाही. अलिकडेच ती तिच्या भावी पतीसोबत तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला गेली होती. आज काल तिने सांताक्लॉजवाली टोपी घालून फोटोही पोस्ट केला आहे. तिला उर्दूवुडची गंगाजमनी तहजीब मान्य आहे. परंतु ती सेक्युलर असली तरी दांभिक नाही. पाकिस्तान प्रेमी नाही. तिच्यातली मानवता आटलेली नाही.

हे ही वाचा:

कुख्यात दारू माफियाला शस्त्रांसह अटक

मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया

केरळमध्ये बनला भाजपचा पहिला महापौर!

‘धुरंधर’चा १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

जान्हवीने हे जे व्यक्त केले ते धाडसच आहे. कारण उर्दूवुडचे हे जे माफीया आहेत, त्यांना जान्हवीने जे काही केले ते पटणार नाही. आता ते तिला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्याची सुरूवातही झालेली आहे. जान्हवीने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या त्या पोस्टनंतर पाकिस्तानचा दलाल ध्रुव राठी याने लगेचच तिच्या विरोधात डार्क साईड ऑफ ब्युटी हा व्हीडियो पोस्ट केला. हा राठी सातत्याने हिंदूविरोधी भूमिका घेत असतो. तो खाल्ल्या मीठाला जागत असतो.

सिनेमाच्या पडद्यावर शंभर जणांवर तुटून पडणारे बॉलिवूडचे तारे किती पुचाट असतात याचे उदाहरण अलिकडेच हृतिक रोशनने प्रस्तुत केले. आदित्य धरच्या धुरंधर सिनेमावर तो घसरला. सिनेमाचे कौतून करताना MAY DISAGREE WITH ITS POLITICS  असे निलाजरे विधान केले. धुरंधरमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या इको सिस्टीमची जी हजामत करण्यात आली, त्यामुळे उर्दूवुडच्या तमाम पाकिस्तानवाद्यांना मिर्च्या झोंबल्या. उर्दूवुडचा पाकिस्तानवाद या सिनेमाने उद्ध्वस्त केला. जगभरातील सिने रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या, पाकिस्तानमध्येही प्रचंड चर्चा झालेल्या या सिनेमाबाबत अनेक ताऱ्यांनी अवाक्षर उच्चारले नाही. सिनेमाला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. काहींनी पाकिस्तानचे मीठ खाल्ले होते. हृतिक रोशन आपल्या कोवळ्या गर्लफ्रेंण्डला टरकला असावा. सबा आझाद शाहीनबाग आंदोलनात सामील होती. धुरंधरची चर्चा टाळून धुरंधरचे मोठे नुकसान होईल अशा गैरसमजात हे तारे होते. सिनेमात किती पाकिस्तान विरोध दाखवलाय, किती देशप्रेम दाखवले आहे. अशी बिनडोक टीकाही या सिनेमावर झाली. प्रत्येक सिनेमात राष्ट्रभक्ती दाखवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांची टिंगल करण्याचे काम शाहरुख खानने त्याच्या ओम शांती ओम या सिनेमात केले. देशभक्ती हा या लोकांसाठी टिंगलीचा विषय आहे. या टिकेला उत्तर देताना आदित्य धर यांची पत्नी यामी गौतमने सवाल केला.  सिनेमात राष्ट्रभक्ती दाखवली यात चूक काय?

परिणामांची चिंता न करता उर्दूवुडचे पाकिस्तान प्रेम तुडवण्याचे काम काही लोक हिंमतीने करतायत. ते धाडस आदित्य धरने दाखवले, त्याची पत्नी यामीने दाखवले. तेच धाडस जान्हवीने दाखवले.

जे काही केले, त्याचे परिणाम काय होऊ शकतील, याचे भान जान्हवीला नसण्याचे काहीच कारण नाही. ती जन्माला आल्यापासून ग्लॅमरचे हे जग पाहते आहे. तिची आई श्रीदेवी एक नामांकीत अभिनेत्री होती. वडील ख्यातनाम निर्माते आहेत. तिला या इंडस्ट्रीचे नियम माहिती आहेत. तरीही तिने हिंमत दाखवली आहे. ती फक्त दिपू चंद्र दासच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करून थांबलेली नाही. तिने अखलाकच्या मृत्यूनंतर छाती बडवणाऱ्या आणि दिपूच्या हत्येनंतर मूग गिळून बसलेल्या तमाम मुखंडाना सुनावले आहे. त्यांचे कान उपटले आहे.

सगळे खान, जोहर एकत्र येऊन आता जान्हवीला एकटं पाडण्याचे प्रयत्न करतील. तिचे करीयर संपवण्याचेही प्रयत्न करतील. एकेकाळी ते शक्य होते. आज शक्य नाही. पाकिस्तान प्रेमी गॅंगचे सिनेमे ज्या प्रेक्षकांनी उचलून उचलून आपटले ते प्रेक्षक आज आदित्य धर सारख्या दिग्दर्शकांच्या पाठीशी उभे राहात आहेत. ते प्रेक्षक जान्हवीच्याही पाठीशी उभे राहतील. उर्दूवुडच्या दुकानदारांनी पाठ फिरवली तरी तेलगू, कन्नड, तामिळ सिनेमात जान्हवीला प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिथे पाकिस्तान प्रेमी सिनेमे बनत नाहीत. हिंदी सिनेमाच्या पडद्यावर खरे खुरे दहशतवादी दाखवणारा पाहिला सिनेमा मणिरत्नमने दिला. तोपर्यंत डॉ.डेंग सारखे दहशतवादी सिनेमाच्या पडद्यावर दिसत होते. जमाना बदलला आहे. जान्हवी त्या जमान्याची प्रतिनिधी आहे. पाकिस्तानवादी खानावळ प्रेक्षकांनीच मोडीत काढली आहे. या पुढे फक्त धुरंदर चालतील, दलिंदर लोकांचा काळ संपलेला आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा