28 C
Mumbai
Monday, April 20, 2026
घरसंपादकीयजैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?

जैशची महिला शाखा देशात सक्रीय आहे का?

Google News Follow

Related

देशात ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेची महिला शाखा सुरू झाली आहे का किंवा सक्रिय झाली आहे का, असा सवाल नाशिक येथील टीसीएस (TCS) मध्ये उघड झालेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या प्रकरणामुळे निर्माण झाला आहे. दिल्लीत २०२५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असलेल्या अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित डॉ. शाहीन सय्यद या दहशतवादी महिलेवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खान या महिलेचा सहभाग उघड झाला आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात एटीएस (ATS) आणि एनआयएची (NIA) मदत मागितली आहे. त्यातून एक गोष्ट पुरेशी स्पष्ट होत आहे की, हे प्रकरण महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून एका खूप मोठ्या साखळीचा भाग आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संदर्भात एनआयए आणि एटीएसला पत्र लिहिले आहे. एनआयएला पत्र लिहिण्याचा अर्थ असा निघतो की, या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. एटीएसची मदत मागण्याचा अर्थ असा आहे की, या प्रकरणाला दहशतवादाचा पैलू असण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांचा विचार केला तर टीसीएसमध्ये जे काही घडले, ते एका व्यापक कटाचा छोटासा हिस्सा आहे हे लक्षात येऊ शकेल.

२०२५ मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याच्या आसपास बॉम्बस्फोट झाला. या कटाची मुळे हरियाणातील अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित असल्याचे उघड झाले. या प्रकरणात डॉ. उमर नबी, मुजम्मील शकील घनी, अदील अहमद रादर आणि डॉ. शाहीन सय्यद यांना अटक करण्यात आली. यापैकी शाहीन या महिला डॉक्टरवर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची महिला शाखा सुरू करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

तसेच २०२३ मध्ये एनआयएने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या संघटनेच्या विरोधात कारवाई केली होती. देशात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. त्यांच्याकडे काही कागदपत्रे सापडली, ज्यात २०४७ पर्यंत देशात शरीया कायदा लागू करण्याचा इरादा व्यक्त करण्यात आला आहे. तो कसा करायचा याचे टप्पे सुद्धा देण्यात आले आहेत. पीएफआयचे संबंध ‘इस्लामिक स्टेट्स’ आणि ‘अल कायदा’ यांसारख्या संघटनांशी असल्याचेही उघड झाले. देशभरात लाखो व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून याबाबत चर्चा होत असते.

देशाला आज पाकिस्तानपासून थेट धोका नाही, परंतु पाकिस्तानची जी ‘अनौरस पिलावळ’ देशात आहे, ती जास्त धोकादायक आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादच्या षडयंत्रात एचआर विभागातील निदा खानचा सहभाग आहे, जी सध्या फरार आहे. लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद आणि बॉम्बस्फोट जिहाद अशा तिन्ही प्रकारांत महिलांचा सक्रिय सहभाग दिसत आहे. लव्ह जिहादमध्ये हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे किंवा त्यांच्याशी मैत्री करून देण्याचे काम या तरुणी किंवा महिला करत असतात. नाशिकमध्ये जे काही झाले त्यात निदा खानचा सहभाग आहे. धर्मांतर हा विषय आहेच, शिवाय हिंदू देवदेवतांबाबत सतत कुचाळकी करणे, त्यांच्याबद्दल हिणकस टिप्पणी करणे, या सगळ्या कृत्यांमध्ये या महिलेचा सहभाग आहे.

देशभरातील ‘पुरोगामी’ही हिंदू देवदेवतांची कुचाळकी करून देशात शरीया लागू करण्याच्या मोहिमेला हातभार लावत असतात. कारण जोपर्यंत तुमच्या मनातील श्रद्धा अढळ आहे, तोपर्यंत तुमचे धर्मांतर कोणीही करू शकत नाही. जेव्हा या श्रद्धा डळमळीत होतात, तेव्हाच धर्मांतराची प्रक्रिया सुरू होते.

पीएफआयच्या पत्रकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य करण्यात आले आहे. कारण जोपर्यंत संघ आहे, तोपर्यंत हिंदुत्व मजबूत आहे, हे त्यांनाही माहिती आहे. मुस्लिम कट्टरवादी संघाला लक्ष्य करतात आणि पुरोगाम्यांनाही संघाच्या नावाने पोटशूळ असतो. मुस्लिम कट्टरवादी हिंदू देवदेवतांबाबत कुचाळकी करतात आणि पुरोगामीही तेच करतात. जिहादी मानसिकतेचे लोक हिंदू समाजातील मागासवर्गीयांना लक्ष्य करतात. त्यांच्या मुलींना बाटवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा हे सगळे पुरोगामी मंडळी शांत असतात. जे सतत शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा जप करतात, असे पुरोगामी आणि दलितांचे तथाकथित नेते या प्रकरणाबाबत तोंड उघडायला तयार नाहीत. याला मराठीत ‘मूक समर्थन’ असा शब्द आहे.
पीएफआयचा जो २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र करण्याचा अजेंडा आहे, त्याचसाठी दिल्लीचा बॉम्बस्फोट केला जातो. कॉर्पोरेट जिहाद आणि लव्ह जिहाद हे त्याचेच भाग आहेत. हा सगळा ‘नंबर गेम’ सुरू आहे. कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये आम्ही ३० टक्के आहोत, देशात १७ टक्के; परंतु अल्लाच्या कृपेने एक दिवस असा येईल, जेव्हा आम्ही या देशात बहुसंख्य असू. त्यावेळी तुम्ही न्याय मागणार नाही, तर तुम्ही न्याय कराल.”

फिरहाद हा तृणमूल काँग्रेसचा नेता आहे. तो जे काही बोलतो ते केवळ स्वप्नरंजन नाही, तर हे स्वप्न देशातील कट्टरवाद्यांचे आहे. त्यांना या देशात एक दिवस बहुसंख्य व्हायचे आहे. जेव्हा ते बहुसंख्य होतील, तेव्हा संविधान शिल्लक राहणार नाही, तर फक्त शरीया असेल. ऐतिहासिक मुस्लिम राजवटीत काफीरांच्या महिलांना ‘लूट’ मानले जाई. त्यांच्यासोबत जे काही वाईटात वाईट होते, ते त्यांच्या दृष्टीने धार्मिक कृत्य असते.

ही संख्या वाढवण्यासाठी सगळ्यात मोठे शस्त्र म्हणजे महिलांना आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणे. एकदा त्यांना जाळ्यात ओढले आणि कुटुंबापासून तोडले की, मग त्यांच्यावर बीफ खाण्याची, बुरखा घालण्याची आणि नमाज पठणाची सक्ती केली जाते. हे मान्य न केल्यास मारहाण करण्याचे स्वातंत्र्यही त्यांचा धर्म देतो, असे मानले जाते.

कुंभमेळ्यामुळे नावारूपाला आलेल्या मोनालिसाला कसे जाळ्यात ओढण्यात आले, हे पाहा. या गरीब तरुणीला आधी झगमगाटाची सवय लावण्यात आली, पैशाचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यानंतर तिचा घात झाला.

हे सर्व करण्यासाठी कोणीतरी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत असते. अमरावतीच्या अयान अहमद या तरुणाने १८० तरुणींचे ३५० अश्लील व्हिडीओ बनवले. हे सर्व करण्यासाठी जो पैसा लागतो, तो कोणीतरी पुरवावा लागतो आणि हे असे करण्याच्या सूचनाही कोणीतरी देत असते. काँग्रेसच्या खासदार यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी ‘अक्कल पाजळली’ आहे. ज्या मुलींचे व्हिडीओ काढले, त्या मुलींना अक्कल नव्हती का, असा सवाल त्यांनी केला आहे. मुस्लिम मतांवर निवडून आल्यावर त्यांच्या विरोधात बोलता येत नाही, मग कोणाच्या तरी विरोधात बोलावे लागतेच. एक महिला म्हणून असा सवाल करताना त्यांना लाज वाटायला हवी होती, कारण या प्रकरणात बऱ्याच मुली अल्पवयीन आहेत. उद्या एखाद्या बलात्कार पीडितेबाबतही त्या असेच विधान करू शकतील. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नेते या देशाच्या इस्लामीकरणाच्या षडयंत्रात थेट सामील आहेत किंवा या षडयंत्राला त्यांचा पाठिंबा तरी आहे. म्हणूनच अशा घटना घडल्यानंतर एकही काँग्रेस नेता त्याचा निषेध करायला पुढे येत नाही. काँग्रेस ही आजची ‘मुस्लिम लीग’ झाली आहे.

हेही वाचा:

दिल्ली विमानतळावर स्पाइसजेट आणि आकासा एअर विमानांच्या पंखाची ऐकमेकांना धडक

आरक्षणातून महिलांना काहीतरी देत आहोत हा भ्रम नको; तो त्यांचा हक्क!

यूएईचे कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियासमोर पसरले हात!

लेन्सकार्ट कर्मचाऱ्यांना टिकली, टिळा लावण्यास बंदी? संस्थापकांनी दिले स्पष्टीकरण

नाशिकच्या प्रकरणात ‘हे सर्व कसे करायचे’ याच्या टिप्स मशिदीतून देण्यात आल्या होत्या. ज्या मशिदींमध्ये असे धंदे चालतात, त्यांच्यावर बुलडोझर चालवला पाहिजे आणि त्यांचे धागेदोरे खणून काढले पाहिजेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणात एनआयएची मदत घेण्याचे जाहीर केले, कारण हे प्रकरण राज्यापुरते मर्यादित नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. यात एनजीओ सामील असणार, विदेशी लिंक्स असणार आणि हवाल्याचा पैसाही असणार. हे सर्व नेटवर्क देशभर विणले गेले आहे. ते अस्तित्वात आहे, याबाबत कट्टरवाद्यांना माहिती असते. ज्यांना माहिती नसते, त्यांना ती व्हॉट्सॲप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून पुरवली जाते. या प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे, त्यांचे गुन्हे न्यायालयात सिद्ध करणे आणि त्यांना कठोर शिक्षा मिळवून देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. ही मंडळी जर सहज सुटली, तर ते देशाला खूप महाग पडण्याची शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा